लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : बोरिवली येथील कस्तुरबा मार्ग परिसरात २० ते २५ जण बॉम्ब तयार करत असल्याचा दूरध्वनी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आल्यामुळे एकच खळबळ उडाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयीताला ताब्यात घेतले असता दारूच्या नशेत त्याने खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असताना आलेल्या अशा दूरध्वनीमुळे पोलीस यंत्रणांवरील ताण वाढत आहे.

कस्तुरबा मार्ग येथील लेबर कॅम्प परिसरात २० ते २५ जण बॉम्ब तयार करत असून ते दहशतवादी असल्याची माहिती देणारा दूरध्वनी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला सोमवारी पहाटे चारच्या सुमारास आला होता. याबाबत गुन्हे शाखेने माहिती दिल्यानंतर बांगुर नगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन एका संशयीताला ताब्यात घेतले. दारूच्या नशेत त्याने हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले. गणेशोत्सवाच्या काळात पोलीस मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी तैनात असताना अशा प्रकारांमुळे पोलीस यंत्रणेवरील ताण वाढतो.

आणखी वाचा-Ganeshotsav 2023: गणेशोत्सवातील गाण्यांचे ‘डिजिटल’ सूर; कॅसेट, सीडी बाद झाल्याने अर्थकारणही बदलले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई पोलिसांना गेल्या पाच महिन्यांत ८० हून अधिक खोटी माहिती देणारे अथवा धमकीचे दूरध्वनी आले आहेत. गेल्या आठवड्यात मंत्रालयात बॅाम्ब ठेवल्याचा निनावी दूरध्वनी ११२ क्रमांकाच्या हेल्पलाईनला आला होता. निनावी दूरध्वनी करून आरोपीने मंत्रालय उडवून देण्याची धमकी दिली. निनावी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची इच्छा केली व्यक्त केली. त्यांच्याशी बोलू दिले नाही तर बॅाम्बने मंत्रालय उडवून देण्याची दिली धमकी दिली. त्यानंतर मंत्रालयात बॅाम्बशोधक पथक दाखल झाले. त्यांनी मंत्रालयातील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाजवळील परिसराची विशेष तपासणी केली. नागरिकांनाही तेथे जाण्यापासून रोखण्यात आले होते. सुमारे दीड तास तपासणी केल्यानंतर मंत्रालयात कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. याप्रकरणी पाथर्डी येथून एका संशयीताला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच दक्षिण मुंबईतील एका महिलेने ३८ वेळा दूरध्वनी करून पोलिसांना त्रास दिला होता.