मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बेस्ट उपक्रमाच्या दुमजली वातानुकूलित बसचे लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार आहे. मात्र दुमजली वातानुकूलित बसमधील अंतर्गत रचना, उंची, आसन क्षमता आणि उभ्याने प्रवास करण्यावर येणारी मर्यादा यामुळे वातानुकूलित दुमजली बसबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे.

मुंबईत बेस्टची पहिली बस वाहतूक १५ जुलै १९२६ पासून सुरू झाली. त्यापूर्वी मुंबईत ट्रॅम धावत होती. कालांतराने यात बदल होत गेले आणि एकमजली बसच्या जोडीलाच दुमजली बसही प्रवाशांच्या सेवेत आली. बेस्टची पहिली दुमजली बस १९३७ साली मुंबईकरांच्या सेवेत आली. या बसला प्रवाशांकडून चांगली पसंती मिळाली. १५ वर्षांपूर्वी बेस्टकडे ९०१ दुमजली बस, तर डिसेंबर २०१९ पर्यंत या बसचा ताफा १२० होता. बेस्टकडे सध्या ४५ विनावातानुकूलित दुमजली बस आहेत. या बसच्या सोबतीला आता वीजेवरील वातानुकूलित बसही दाखल होणार आहेत. त्यामुळे यापुढे प्रवाशांचा दुमजली बसगाड्यांमधूनही गारेगार प्रवास होणार आहे. बेस्ट उपक्रमाने या बस स्विच मोबिलिटी कंपनीकडून भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. एकूण ९०० वातानुकूलित बस विविध कंपन्यांकडून येत्या काही महिन्यात टप्प्याटप्यात येतील. पहिल्या टप्प्यात २०० बस स्विच मोबिलिटी कंपनीकडून दाखल होतील. सप्टेंबरपासून नवीन वातानुकूलित दुमजली बस प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या बसचे लोकार्पण मुंबईत गुरुवारी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.  

TCS Announces 9 percent Rise, Q4 Net Profit, Rs 12 thousand 434 Crore, Declares Final Dividend, Rs 28 per Share, tata consultancy services, finance article, finance news, share market, stock market,
टीसीएसला १२,४३४ कोटींचा नफा; तिमाहीगणिक ९.१ टक्के वाढ
रेल्वे सुसाट…! गेल्या वर्षभरात साडेपाच कोटी प्रवासी अन् फुकट्या प्रवाशांना २७ कोटींचा दंड
Panvel Municipal Corporation
एका दिवसांत तीन कोटींहून अधिक कर जमा, पनवेल महापालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत ३३३ कोटी रुपये
Loksatta viva A glamorous celebration of fashion Lakme Fashion Week Geo World Garden
लॅक्मे फॅशन वीकची सेलिब्रिटी मांदियाळी

वातानुकूलित दुमजली बसची वैशिष्टय

– पर्यावरणपूरक अशी विजेवरील वातानुकूलित दुमजली बस.

– नवीन दुमजली बस भारत-६ श्रेणीतील असून या बसमध्ये स्वयंचलित गिअर आहे.

– बस थांब्याची माहिती देण्यासाठी बसमध्येच इलेक्ट्रॉनिक बोर्ड उपलब्ध.

– प्रथमोपचार पेटी

– बसच्या दोन्ही बाजूला स्वयंचलित दरवाजे आणि ते उघडबंद करण्याचे नियंत्रण बस चालकाकडे आहे.

– सीसीटीव्ही कॅमेरे, बसमधील दोन वाहकांना परस्पर संपर्कासाठी विशेष व्यवस्थाही असतील. तर

– ८० मिनिटांत बसचे चार्जिंग होते.

वातानुकूलित दुमजली बसमधील आसनक्षमता कमी – नव्या वातानुकूलित दुमजली बसमधील प्रवासी वाहून नेण्याची क्षमता कमी आहे. या बसमध्ये आसनक्षमता ६६ असून उभ्याने दहा प्रवासी प्रवास करू शकतात. तर सध्याच्या विनावातानुकूलित दुमजली बसची आसन क्षमता ७८ असून या बसमधूनही उभ्याने दहा प्रवासी प्रवास करण्याची क्षमता आहे.