मुंबईः मुंबई पोलीस दलातील १० उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचे मंगळवारी खांदेपालट करण्यात आले. यावेळी इतर जिल्ह्यातून मुंबईत बदली होऊन आलेल्या पाच उपायुक्तांनाची नव्या ठिकाणी पदस्थापना करण्यात आली. याबाबचे आदेश मंगळवारी सर्व विभागांना देण्यात आले.
सोलापूर येथून मुंबईत बदली होऊन आलेले अजीत बोराडे यांची वाहतूक विभाग (पश्चिम) येथे नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय वसंत जाधव यांची मुखालयत-१, निलेश अष्टेकर यांची सशस्त्र पोलीस (कलिना), महेंद्र पंडीत यांची परिमंडळ-५ व सुनील लोखंडे यांची सशस्त्र पोलीस दल मरोळ येथे पदस्थापना करण्यात आली आहे. त्यातील लोखंडे पदस्थापनेच्या प्रतीक्षेत होते. तर निलेश अष्टेकर व वसंत जाधव राज्य गुप्तवार्ता विभागातून नुकतेच बदली होऊन मुंबईत आले आहेत. तसेच महेंद्र पंडीत ठाणे शहर येथे कार्यरत होते. नुकतीच त्यांची बदली मुबंईत करण्यात आली होती. त्यांच्याशिवाय यापूर्वी मुंबईत कार्यरत उपायुक्त गणेश गावडे यांची संरक्षण, संदीप जाधव यांची परिमंडळ-११, आनंद भोईटे यांची सशस्त्र पोलीस (नायगाव), मितेश घट्टे यांची सशस्त्र पोलीस (ताडदेव) व श्रीनिवास घाडगे यांची मंत्रालय सुरक्षा या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.
गृह विभागाने उपायुक्त दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या केल्या होत्या. त्यानंतर आता या पाच अधिकाऱ्यांना नवीन ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच यापूर्वीपासून मुंबईत कार्यरत पाच पोलीस उपायुक्तांची बदली करण्यात आली आहे. तसेच मुंबईत कार्यरत तीन उपायुक्तांची मुंबईबाहेर बदली करण्यात आली होती.