मुंबईत मागील २४ तासांत दमदारा पाऊस झाला. दक्षिण कोकणावर पावसाळी ढग दाटले आहेत. पुढील दोन दिवसांत मुंबई व कोकणात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. उद्या पावसाचा जोर अधिकच असेल असे देखील सांगण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात पुन्हा पावसाला अनुकूल असे वातावरण तयार झाले आहे. मुंबई, ठाण्यासह कोकणात चार दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. १६ जुलैपर्यंत मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग रत्नागिरी, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला गेला आहे. उपमहासंचालक (डीडीजी), आयएमडी, मुंबई यांनी ही माहिती दिली आहे.

भारतीय हवामान खात्याचे मुंबई केंद्राचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर यांनी काल पावसाबद्दल माहिती दिली होती. आयएमडी मॉडेल नुसार मंगळवार / बुधवार, १४ व १५ जुलै रोजी, मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितलं होतं.

आजपासून राज्यात पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दक्षिण कोकणात जोरदार, अंतर्गत भागात मध्यम पाऊस पडू शकतो. तर विदर्भात मंगळवारपासून पावसाची शक्यता असल्याचे विभागाने सांगितले.जुलैच्या पहिल्या आठवडय़ात किनारपट्टीसह राज्यभरात मान्सून सक्रीय होणे, दक्षिण गुजरातमधील चक्रवाती वर्तुळाकार स्थितीमुळे अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीदेखील झाली. त्यानंतर गेल्या तीन दिवसात पावसाचे प्रमाण कमी झाले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forecast for the next 2 days is heavy rainfall in konkan mumbai msr
First published on: 13-07-2020 at 09:09 IST