रावण दहनाचा कार्यक्रम बघत असलेल्या लोकांच्या गर्दीवर भरधाव ट्रेन आल्याने या रेल्वेखाली ६१ लोक ठार झाले तर ५० पेक्षा जास्त लोक जखमी झाले असल्याची अत्यंत भयानक घटना पंजाबच्या अमृतसर मध्ये घडली आहे. हा रेल्वे रुळांवर झालेला सर्वात मोठं अपघात असून या अपघाताची सखोल चौकशी करण्याची तसेच या अपघाततील मृतांच्या परिवाराला पाच लाख रुपये सांत्वनपर आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमृतसर मधील रेल्वे अपघात अत्यंत दुःखद घटना आहे. मोठया प्रमाणात जीवित हानी झाल्याबद्दल ना रामदास आठवले यांनी तीव्र शोकभावना व्यक्त केली असून मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.  रावण दहन चा कार्यक्रम रेल्वे रुळांजवळ कोणतीही परवानगी न घेता आयोजित करण्यात आला . फटाक्यांच्या आतषबाजीत रेल्वे रुळांवर उपस्थित बघ्यांच्या गर्दीला रेल्वेचा आवाज आला नाही.त्यात शंभरहून अधिक जखमी आणि ६१ जण मृत्युमुखी पडल्याची दुःखद घटना घडली आहे.या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना सरकारने ५ लाख रुपयांची सांत्वनपर मदत करण्याची मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Give compensation of five lakh rupees to families of the dead people in amritsar train accident says ramdas athawale
First published on: 20-10-2018 at 20:50 IST