मुंबई: मुंबईत गुटखा, पान मसाला व सुगंधीत पदार्थांची मोठ्या प्रमाणात बेकायदा विक्री होत आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने मागील काही दिवसांपासून या पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात माेहीम हाती घेतली आहे. त्यानुसार १२ दिवसांत अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील विविध ठिकाणांहून तब्बल ३ लाख ८४ हजार ४०५ रुपये किंमतीचा गुटखा, पान मसाला व सुगंधीत तंबाखू हे पदार्थ जप्त केले, तर या पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी ४८ जणांना अटक करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासनाने शहरातील गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्यांविरोधात धडक माेहीम हाती घेतली आहे. त्यानुसार २० नोव्हेंबर ते १ डिसेंबर या १२ दिवसांत शहरातील विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्यानुसार मुंबईतील वांद्रे परिसरातील हिल रोड, बेहरामपाडा, खेरवाडी रोड, ए.के. मार्ग या ठिकाणांवरील १० दुकानांवर कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे घाटकोपर पश्चिमेकडील लालबहाद्दूर शास्त्री मार्ग आणि अकबर लाला कम्पाऊंड, साकीनाका येथील पॅकवेल कम्पाऊंड, लालबाग येथील चिवडा गल्ली, नागपाडा येथील अरब गल्ली, कामाठीपुरा, जोगेश्वरी पश्चिमेकडील ओशिवरा, बोरिवली पश्चिमेकडील चामुंडा सर्कलजवळ, परळ एस. टी आगराजवळ, मुलुंड आणि मालाड या भागात ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा… मुंबईः महिला पोलिसाला चावणाऱ्या आरोपीला अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्थानिक पाेलिसांच्या मदतीने करण्यात आलेल्या या कारवाईत अन्न व औषध प्रशासनाने ३ लाख ८४ हजार ४०५ रुपयांचा गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त केला. कारवाई केलेल्या या दुकानांतून गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचे ४८ नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. तसेच या प्रकरणी ४२ दुकानांना टाळे ठोकून ४८ जणांना अटक केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासानाचे सहआयुक्त शैलेश आढाव यांनी दिली.