High Court Provides security to interfaith couple : मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना एका आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्याला सुरक्षा प्रदान करण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षेसह गुजरात पोलीस या महिलेला घेऊन जाईल अशी शंका न्यायालयाला वाटत होती. न्यायमूर्तींनी या जोडप्याशी बातचीत करून हा आदेश पारित केला आहे. तत्पूर्वी या महिलेने न्यायमूर्तींना सांगितलं की तिने तिच्या इच्छेने त्या व्यक्तीशी लग्न केलं आहे. तो इसम विवाहित असून तीन मुलांचा पिता आहे. विवाहित पुरुषाशी लग्न केल्यानंतर या महिलेने तिच्या व पतीच्या जीवाला धोका आहे असं सांगत पोलीस सुरक्षेची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने शनिवारी (२७ जुलै) निकाल दिला.

न्यायालयाने म्हटलं आहे की, याचिकाकर्त्यांना आठवड्याचे सातही दिवस, २४ तास सशस्त्र सुरक्षा रक्षक प्रदान केला जावा. हा सुरक्षारक्षक ८ ऑगस्ट २०२४ पर्यंत याचिकाकर्त्यांबरोबर राहील. याचिकाकर्ते कुठेही गेले तरी सुरक्षारक्षक त्यांच्याबरोबरच असेल. तसेच खंडपीठाने अहमदाबादमधील नारोल पोलीस ठाण्याला निर्देश दिले आहेत की या प्रकरणावरील सुनावणी होईपर्यंत याचिकाकर्त्यांविरोधात कोणतंही पाऊल उचलू नका.

हे ही वाचा >> Delhi Coaching Incident: दिल्ली IAS कोचिंग सेंटर दुर्घटनेवर राहुल गांधींची प्रतिक्रिया; म्हणाले, “संस्थांच्या बेशिस्तपणाची किंमत…”

तरुणीविरोधात घरातील सोनं व पैसे चोरल्याचा गुन्हा दाखल

या जोडप्याच्या बाजूने न्यायालयात उपस्थित अधिवक्ते एम. एल. कोचरेकर आणि मोहम्मद अहमद शेख यांनी न्यायमूर्तींना सांगितलं की “आमच्या आशिलांवर चोरीचा खोटा खटला दाखल करण्यात आला आहे. त्यांनी लग्न केल्यानंतर हा खटला दाखल केला गेला आहे.” या सुनावणीवेळी २४ वर्षीय महिलेचे आई-वडील व भाऊ गुजरात पोलिसांसह मुंबई उच्च न्यायालयात उपस्थित होते.

हे ही वाचा >> Old Rajender Nagar Incident : आयएएस कोचिंग सेंटरच्या मालकासह दोघांना अटक; परवानगीशिवाय तळघरात सुरू होती लायब्ररी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तरुणीचा आई-वडिलांना भेटण्यासही नकार

दरम्यान, महिलेने खंडपीठाला सांगितलं की, “१५ जुलै २०२४ रोजी मी माझ्या घरातून बाहेर पडले तेव्हा मी घरातून काहीच घेतलं नव्हतं. माझ्या आई-वडिलांनी एक सोन्याची चेन माझ्या गळ्यात घातली होती, तसेच झुमके देखील घातले होते. ही चेन व झुमके मी त्यांना परत द्यायला तयार आहे.” दरम्यान, या तरुणीने तिच्या आई-वडिलांच्या घरी परतण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला, तसेच त्यांना भेटण्यासही नकार दिला.