मुंबई : मुंबईत कमाल तापमानाचा पारा उतरल्यानंतर काहीसा दिलासा मिळाला असून मुंबईतील पारा पाच ते सहा अंशानी घसरला आहे. दरम्यान, आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे मुंबई तसेच उपनगरांत शनिवार आणि रविवार वातावरणात अधिक उष्मा जाणवेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा >>> ग्रॅच्युईटी नकारल्याने आयआयटी मुंबईतील कर्मचाऱ्याची आत्महत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तापमानाचा पारा कमी झाल्यानंतर मुंबईत उन्हाची तीव्रता कमी जाणवत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी ३३.२ अंश सेल्सिअस, तर, सांताक्रूझ केंद्रात ३३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, मुंबईत हवेत शनिवार आणि रविवार आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल. त्यामुळे उकाड्याची झळ बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई तसेच उपनगरांत शनिवार, रविवारी कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअसदरम्यान असेल. मात्र आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे उकाडा सहन करावा लागेल. राज्यातीस सर्वाधिक ४३.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद शुक्रवारी मालेगाव येथे झाली. याशिवाय सोलापूर (४३.२), बीड(४२), नांदेड (४२.६), जळगाव(४२.४), येथे पारा ४० अंशापार गेला होता.