मुंबई : केंद्र सरकारने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून जाहीर केलेल्या क्षेत्रात राज्यातील २५१५ गावांचा समावेश आहे. यासंबंधी नव्याने जारी अधिसूचनेवर अंमलबजावणी झाल्यास विशेषत: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांतील अनेक प्रस्तावित प्रकल्प, उद्याोगांवर प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

केरळमधील वायनाड जिल्ह्यात नुकतेच अतिपावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे दोनशेहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून, कित्येक जण बेपत्ता आहेत. या घटनेनंतर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असा पश्चिम घाट आणि या क्षेत्रातील विकासकामांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. यासंदर्भात ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी २०११मध्ये केंद्र सरकारला सादर केलेल्या अहवालाकडेही लक्ष वेधले जात आहे.

Increase in epidemic diseases in Maharashtra state Mumbai news
राज्यात साथरोग आजारात वाढ! राज्य संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण उच्चस्तरीय समितीची बैठक…
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
suicides farmers Vidarbha, suicides farmers,
आठ महिन्यांत ६९८ आत्महत्या, विदर्भातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था
bhandardara dam, new name, adya krantikarak veer raghoji bhangre jalashay
राज्यातील ‘या’ प्रसिद्ध धरणाचे नाव बदलले, आता ‘आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय’ म्हणून ओळखले जाणार
Roads Alibaug, MMRDA, Alibaug tourists,
अलिबागमधील दहा गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास होणार, एमएमआरडीए ३२५ कोटी रुपये खर्च करणार, पर्यटकांना दिलासा
Satara, Water storage, Koyna, Dhome,
सातारा : कोयना, धोम, उरमोडी, तारळी धरण ९६ टक्क्यांवर; प्रमुख प्रकल्पातील पाणीसाठा १४५ टीएमसीवर
Thane Multi Storey vehicle Parking
ठाणे : वागळे इस्टेटमधील बहुमजली वाहनतळाची क्षमता वाढणार
Maharashtra Dighi port marathi news
औद्योगिक स्मार्ट शहरांमध्ये राज्यातील दिघीचा समावेश, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाने रोजगाराला चालना

पश्चिम घाटाला पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील घोषित करण्यासाठीचा पाचवा मसुदा केंद्राने नुकताच जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यातील १७ हजार ३४० चौ. किमी क्षेत्र संवेदनशील म्हणून घोषित करण्याचे प्रस्तावित आहे. यापूर्वी २०२२ साली जाहीर केलेल्या मसुद्यानुसार राज्यातील २१३३ गावांचा समावेश संवेदनशील क्षेत्रात करण्याचे प्रस्तावित होते. त्यातील ३८८ गावे वगळण्याची मागणी करण्यात येत होती. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनातही हा विषय गाजला होता. विकास प्रकल्प, औद्याोगिक प्रकल्प, खाणी प्रस्तावित असलेली गावे वगळण्याबाबत केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले होते. गेल्या वर्षी जानेवारीत साधारण ५८२ गावे वगळण्याची विनंती केंद्राकडे करण्यात आली होती. मात्र, आता नव्याने जाहीर झालेल्या या मसुद्यात गावे वगळण्याऐवजी राज्यातील संवेदनशील म्हणून घोषित गावांची संख्या वाढल्याचे दिसते आहे.

हेही वाचा >>>Mumbai Crime : मुलाचं विमानाचं तिकिट काढलं, नातेवाईकाला बँकेची माहिती दिली; पत्नीची हत्या करून पती…; गोरेगावात खळबळ!

कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड या भागांत अनेक विकास प्रकल्प प्रस्तावित आहेत. पुणे शहराच्या लगत वाढ होणारी मुळशी, मावळ, आंबेगाव या भागांतील अनेक गावे संवेदनशील क्षेत्र म्हणून प्रस्तावित आहेत. रत्नागिरीतील परशुराम-पेढे, राजापूर, खेड, लांजा येथील अनेक गावे, सिंधुदुर्गातील देवगड, कणकवली, सावंतवाडी, कुडाळ, वैभववाडी येथील गावेही संवेदनशील घोषित होणार आहेत. नुकताच राज्याने सातारा येथील विकास कामांचा आढावा जाहीर केला. मात्र, महाबळेश्वर, वाई, सातारा, पाटण येथील अनेक गावांचा केंद्राने जाहीर केलेल्या आराखड्यात समावेश आहे. यापूर्वी कोल्हापूर येथील अनेक गावे वगळण्याची मागणी प्राधान्याने होत होती. कोल्हापूरमधील पन्हाळा, गगनबावडा, भूदरगड, चंदगड, आजरा, राधानगरी येथील गावांचा मसुद्यात समावेश आहे. तर रायगडमधील रोहा, महाड, माणगाव, कर्जत, खालापूर, सुधागड येथील गावे समाविष्ट आहेत. मुंबई महानगर प्रदेशात आलेल्या पालघर येथेही अनेक विकास प्रकल्प प्रस्तावित आहेत. तेथील जव्हार, मोखाडा, वाडा येथील गावांचा मसुद्यात समावेश असल्याचे दिसते आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती गावे?

नगर (४८), धुळे (७), कोल्हापूर (२१२), नंदुरबार (२), नाशिक (२०२), पालघर (१२६), पुणे (४१५), रायगड (४३७), रत्नागिरी (३११), सांगली (१३), सातारा (३३६), सिंधुदुर्ग (१९८), ठाणे (२०८).