मुंबई: गोविंदा सराव पथकांना मुंबई महापालिकेने क्रेन आणि दोरी व सुरक्षिततेसाठी सेफ्टी बेल्ट पुरवावे असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला दिले आहेत. गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका एवढा खर्च करीत असते तर दहिहंडी उत्सवासाठी खर्च करायला काय हरकत आहे अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

हेही वाचा: अल्पवयीन मुलावर धार्मिक शिक्षण संस्थेत लैंगिक अत्याचार, अत्याचार करणाऱ्या १५ वर्षीय मुलाची बालसुधारगृहात रवानगी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोविंदा, दहिहंडी आणि उंच मानवी थर ही मुंबईची संस्कृती आणि ओळख आहे. ही ओळख टिकावी म्हणून प्रो गोविंदासाठी जिल्हा विकास नियोजन विभागातून दोन कोटींचा निधी देण्यात आला. मात्र मुंबईत विविध ठिकाणी जी गोविंदा पथके सराव करीत असतात त्यांना मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयांनी क्रेन, दोरी, सेफ्टी बेल्ट पुरवावे असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत. तसेच मंगळवारी गोपाळकालाच्या दिवशी देखील ही सेवा पुरवावी, असेही आदेश त्यांनी दिले आहेत. वरच्या दोन तीन थरांवर असलेल्या गोविंदांच्या सुरक्षेसाठी या उपाययोजना कराव्यात. दुर्घटना घडून कोणती जिवितहानी होऊ नये याकरीता सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून हा खर्च करावा असेही आदेश त्यांनी दिले आहेत. हे पहिलेच वर्ष असून किती आणि कशाप्रकारे क्रेन पुरवता येतील त्याचा विचार करावा व पुढीलवर्षी जास्तीतजास्त मंडळांना क्रेन पुरवाव्या असेही त्यांनी पालिका प्रशासनाला सांगितले.