मुंबई : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. प्रचंड दूरदृष्टी आणि विद्वत्ता असलेल्या डॉ. आंबेडकरांनी संविधान सभेच्या माध्यमातून केवळ एक उत्कृष्ट मसुदा तयार केला नाही, तर विविध तरतुदींमागील तत्त्वज्ञानही अधोरेखित केले. भारताला अखंड ठेवून एकसंध राखणे हे डॉ. आंबेडकरांचे सर्वोच्च योगदान आहे. स्वातंत्र्याचा अमृतकाळ साजरा करीत असताना जातीभेद व उच्चनीचता विरहित समाजाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावेत आणि डॉ आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत साकार करावा’, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि मुंबई विद्यापीठाचे माजी विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन येथील ‘ग्रेज इन’ या संस्थेतून बॅरिस्टर ही सर्वोच्च पदवी प्राप्त केली आणि मुंबई उच्च न्यायालयाची वकिलीची सनद प्राप्त करून ५ जुलै १९२३ रोजी वकिलीस प्रारंभ केला. या ऐतिहासिक घटनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा, मुंबई विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र व विधि विभाग आणि अधिवक्ता परिषद कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अ ज्युरिस्ट’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Ambedkarist activists active in support of Mavia Discuss the danger of changing the constitution
‘मविआ’च्या समर्थनार्थ आंबेडकरवादी कार्यकर्ते सक्रिय; राज्यघटना बदलली जाण्याच्या धोक्याची चर्चा
Why Asaduddin Owaisi support to Prakash Ambedkar in Akola Lok Sabha Constituency
प्रकाश आंबेडकर यांना ओवेसीचा पाठिंबा का?
Dr. Babasaheb Ambedkar and Buddhism
विश्लेषण: ‘या’ जाती बौद्ध धर्म का स्वीकारतात? त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान काय?
Nana Patole Offers 2 Extra Seats to Vanchit Bahujan Aghadi from congress quota
वंचितला काँग्रेसच्या कोट्यातून दोन जागा वाढवून देण्याचा प्रस्ताव, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती

या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्रकुमार उपाध्याय, राज्याचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष अ‍ॅड. विवेकानंद घाटगे, अधिवक्ता परिषदेच्या राष्ट्रीय सचिव अ‍ॅड. अंजली हेळेकर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते. 

पुस्तकांचे प्रकाशन, चर्चासत्रे

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अ ज्युरिस्ट’ या विशेष कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते प्राचार्य डॉ. बळीराम गायकवाड यांनी संपादित केलेल्या ‘चिंतनातील क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ आणि डॉ. संभाजी बिरांजे संपादित ‘करवीर संस्थान, बॅरिस्टर आंबेडकर आणि कोर्ट कचेरीतील बहिष्कृत’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. त्याचबरोबर चर्चासत्रांमध्ये विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले.