मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढी पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. यावेळी शिंदे गटाचा उल्लेख ‘अलीबाबा आणि ४० जण’ असा करत महाराष्ट्र लुटून सुरतेला नेणारे हे पहिलेच पाहिले, असं राज ठाकरे म्हणाले. त्याबरोबरच उद्धव ठाकरेंवर परखड टीका करत आपल्याला शिवसेनेतून बाहेर करण्यासाठी षडयंत्र रचण्यात आलं, असा दावाही राज ठाकरेंनी केला. या सर्व आरोपांवर आता शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली आहे. २०-२५ वर्षांनंतर हे साक्षात्कार त्यांना होत आहेत, असं शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

“उद्धव ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय…”

“मुळात जुन्या कढीला आलेला हा ऊत दिसतोय. २०-२५ वर्षांनंतर हे साक्षात्कार बाहेर येत आहेत. सर्वांनी एकत्र येऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची कोंडी केलेली दिसतेय. त्यांचं नाव घेतल्याशिवाय राजकारण चालूच शकत नाही असं महाराष्ट्रात चित्र दिसतंय”, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

Raj Thackeray Gudi Padwa Melava 2024 Marathi News
MNS Gudi Padwa Melava: “मला शिवसेना पक्षप्रमुख व्हायचं असतं तर..”, राज ठाकरेंनी ‘त्या’ चर्चेवर मांडली भूमिका
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Supriya Sule
“सगळे पुरूष माझ्याविरोधात…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; म्हणाल्या, “मी स्वाभिमानी मुलगी, मोडेन पण वाकणार नाही!”
pankaja munde manoj jarange
“मला खात्री आहे, ती माणसं…”, प्रचारावेळी राडा करणाऱ्यांबाबत पंकजा मुंडेंचं वक्तव्य; मनोज जरांगेंचा उल्लेख करत म्हणाल्या…

Video: पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचा सरकारला इशारा; माहीमच्या समुद्रातील ‘तो’ व्हिडीओ दाखवून म्हणाले, “…नाहीतर तिथे गणपती मंदिर बांधू!”

“उद्धव ठाकरे यांच्याकडून धनुष्यबाण किंवा शिवसेना कोणत्या कारस्थानाने काढून घेतलीये हे सगळ्यांनी बघितलं आहे. त्यात किती जणांनी गळाभेटी घेतल्या आहेत, कितीजण त्यात मी नाही असं म्हणू शकत नाहीत, ते दिसतंय लोकांना”, असं सूचक विधानही किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.

“माझ्या भाषणानंतर उद्या तोंड उचकटू नका, नाहीतर…”, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरे गटाला थेट इशारा!

“माहीमच्या समुद्रातील अनधिकृत बांधकामावर त्वरीत कारवाई करा”

दरम्यान, माहीमच्या समुद्रात अनधिकृतपणे दर्ग्याचं बांधकाम चालू असल्याचा दावा राज ठाकरेंनी व्हिडिओच्या आधारे केला आहे. त्यावरही किशोरी पेडणेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ते अनधिकृत आहे. ते त्वरीत सगळ्यांनी मिळून कारवाई करायला हवी. मग ते काहीही असो. मंदिर असो, दर्गा असो अनधिकृत करू नका. तेही जिथे २४ तास गस्त असते तिथे या गोष्टी घडत आहेत. पण ते अडीच वर्षांनंतरच का सांगितलं, हाही एक मुद्दा आहे”, असं त्या म्हणाल्या.