|| संजय बापट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नव्या अलिबाग, मुरुड, दापोली, रत्नागिरीचा समावेश

मुंबई :  कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेने महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.  समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर उभारण्यात येणारा द्रुतगती महामार्ग (एक्सप्रेस वे) आणि कोकण सागरी महामार्ग यांच्या  दरम्यान नवीन  अलिबाग, नवीन मुरूडसह दापोली, रत्नागिरी, देवगड आदी  १० ते १२  ठिकाणी नवनगरे विकसित करण्यात येणार आहेत.

त्याबाबतचा आराखडा मुख्यमंत्र्यांसमोर सादर करण्यात आल्यानंतर त्यांनी या प्रकल्पास हिरवा कंदील दाखविल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.  दोन नवनगरांमधील अंतर किमान ३० किलोमीटर असेल तर ही सर्व नवनगरे सध्याच्या शहरांच्या आसापासच असतील.

कुठे… कुठे..?  राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावर नवनगरे विकसित के ली असून त्याच धर्तीवर कोकणताही  ऐतिहासिक, पर्यटन, कृषी उत्पादन क्षेत्रांचा विचार करून नवीन अलिबाग, नवीन मुरुड, नवीन दिघी, दिवे आगार, श्रीवर्धन,  हरिहरेश्वर, दापोली, गुहागर, जयगड, गणपतीपुळे, रत्नागिरी, राजापूर, देवगड, मालवण आणि रेडी या ठिकाण ही नवनगरे विकसित करण्यात येणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kokan samrudhi highway expressway important announcement by shiv sena akp
First published on: 17-01-2021 at 01:58 IST