मुंबई : दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता कोकण रेल्वेने जादा रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०७३६५ एसएसएस हुबळी जंक्शन – मडगाव जंक्शन मार्गे यशवंतपूर जंक्शन एक्स्प्रेस शुक्रवारी पहाटे ५.१५ वाजता एसएसएस हुबळी जंक्शन येथून सुटेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता मडगाव येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०७३६६ मडगाव जंक्शन – बंगळुरू सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल मार्गे बंगळुरू एक्स्प्रेस शनिवारी सकाळी ६.३० वाजता मडगाव येथून सुटेल. ही रेल्वेगाडी त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता बेंगळुरू येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला एकूण २० डबे असतील.

गाडी क्रमांक ०६२०५ बंगळुरू – मडगाव एक्स्प्रेस रविवारी दुपारी १२ वाजता बंगळुरू येथून सुटेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता मडगाव येथे पोहचेल. गाडी क्रमांक ०६२०६ मडगाव – बंगळुरू एक्स्प्रेस सोमवारी सकाळी ६.३० वाजता मडगाव येथून सुटेल. ही रेल्वेगाडी त्याच दिवशी बंगळुरू येथे रात्री ११.३० वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला २० डबे असतील.

गाडी क्रमांक ०७३१७ क्रांतीवीरा सांगोली रायन्ना बंगळुरू – वास्को दा गामा स्पेशल एक्स्प्रेस शुक्रवारी रात्री ११.२५ वाजता क्रांतीवीरा सांगोली रायन्ना बंगळुरू येथून सुटेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी दुपारी २.५५ वाजता वास्को द गामा येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०७३१८ वास्को द गामा ते बंगळुरू विशेष एक्स्प्रेस वास्को द गामा येथून शनिवारी सायंकाळी ५ वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता बंगळुरू पोहोचेल. या रेल्वेगाडीला एकूण २२ एलएचबी डबे असतील.