लोकल प्रवास आणखी सुकर

पश्चिम रेल्वेवर मुंबई सेन्ट्रल ते बोरीवलीदरम्यान चारच मार्गिका होत्या.

पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहाव्या मार्गाला गती

मुंबई : मेल-एक्स्प्रेस गाडय़ांना आणखी एक मार्गिका मिळावी आणि लोकल प्रवासही सुकर व्हावा यासाठी मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान सहावी मार्गिका उभारली जात आहे. या मार्गातील  अडथळे संपुष्टात आले असून त्याची विविध कामे पूर्ण करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. यात पुलांच्या कामे, संरक्षक िंभंत उभारणी यासह अनेक कामे त्वरित हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. करोनामुळे गेल्या वर्षांपासून ही कामे थंडावली होती. आता त्याला गती दिली जात असून पुढील वर्षांपर्यंत ही मार्गिका कार्यान्वित करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.

पश्चिम रेल्वेवर मुंबई सेन्ट्रल ते बोरीवलीदरम्यान चारच मार्गिका होत्या. त्यामुळे लोकल गाडय़ांबरोबरच मेल-एक्स्प्रेसही याच मार्गिकांवरुन जात होत्या. परिणामी लोकलचे वेळापत्रक विस्कळीत होत होते. तर लोकल फे ऱ्याही वाढवता येत नव्हत्या. अखेर मुंबई सेन्ट्रल ते बोरीवली दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी ९१८ कोटी रुपयांहून अधिक खर्चाची तरतुद रेल्वेने के ली असून यातील पाचव्या मार्गिके चे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर त्वरीत सहाव्या मार्गिके चे काम हाती घेतले. परंतु दहा वर्षे होत आली तरीही सहाव्या मार्गिके चे काम पूर्ण झाले नाही. कांदिवली ते मालाड, मालाड ते गोरेगााव, राम मंदिर ते जोगेश्वरी येथील रुळांजवळील अतिक्र मण तसेच वांद्रे येथे एका बांधकामामुळे बराच अडथळा निर्माण झाला. होणारा विरोध, न्यायालयीन लढा यामुळे प्रकल्प कामाला विलंब होत गेला.  या प्रकल्पातील बांधितांचे स्थलांतरही करण्यात आले. अडथळे पार पाडल्यानंतर रूळांची कामेही पूर्ण करण्यावर भर दिला जात असल्याची माहिती सूत्रांनी. तर अन्य विविध कामांसाठी निविदा काढल्या आहेत. तसेच या मार्गिके तील वांद्रे ते बोरिवली दरम्यान मोठय़ा व लहान पुलांचे कामे, सीमा भिंत, संरक्षक भिंत इत्यादी बांधकामांसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. ही मार्गिका पुढील वर्षांपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

विविध कामांसाठी निविदा

मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहाव्या मार्गाचे काम वेगाने पूर्ण के ले जात आहे. मार्गिके तील अडथळे दूर झाले आहेत. या मार्गिकेतील वांद्रे ते बोरिवली दरम्यानची विविध कामे हाती घेतली असून त्यासाठी निविदा काढली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Local travel is even easier western railway ssh

ताज्या बातम्या