मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेल येथून सुटणाऱ्या लांबपल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकासाठी क्यूआर कोड सुरू केला आहे. मध्य रेल्वे, मुंबई विभागाने प्रवाशांना आवश्यक प्रवास तपशील जलद आणि सोयीस्करपणे उपलब्ध करून देण्यासाठी क्यूआर कोड-आधारित माहिती प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) आणि पनवेल येथून प्रवास सुरू करणाऱ्या प्रवाशांना आता स्थानकांवर उपलब्ध क्यूआर कोड स्कॅन करून खालील माहिती मिळवता येईल.
- मेल/एक्सप्रेस रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक
- प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) नियम
- मार्ग नकाशा
- मध्य रेल्वेचे अधिकृत संकेतस्थळ
- तक्रार निवारण आणि मदतीसाठी रेलमदद पोर्टल
- ही माहिती मराठी, इंग्रजी, हिंदी या तीन भाषांमध्ये उपलब्ध आहे.