मुंबई : गेल्या आठवड्यात सक्रिय झालेल्या पावसाचा जोर आजपासून ओसरणार आहे. संपूर्ण राज्यात मागील काही दिवसांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, आजपासून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर ओसरणार आहे. काही भागात अधूनमधून हलक्या सरी बरसतील. मात्र, मुसळधार पावसाची शक्यता नाही, असे हवामान विभागाने सांगितले आहे.

राज्यात रविवारपर्यंत सर्वत्र चांगला पाऊस पडला. कोकणासह विदर्भात सर्वाधिक पाऊस झाला. मुंबईतही बऱ्यापैकी पाऊस पडला. मात्र, आजपासून पावसाचा जोर ओसराणार आहे. मुसळधार नाही पण अधूनमधून हलक्या सरी बरसतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे आजपासून मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे.

कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय

वायव्य मध्य प्रदेश आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे . पश्चिमेकडे सरकत ही प्रणाली निवळूण जाणार . मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेर, कोटा, दाल्तोंगज, दिघा ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे. गुजरातपासून उत्तर केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

मराठवाड्यात सामान्य पावसाची स्थिती

मराठवाड्यात हंगामात पहिल्यांदाच सामान्य पावसाची स्थिती नोंदली गेली आहे. गेल्या आठवड्यात या भागात चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे येथील शेतीसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. मराठवाड्यात २७ जुलैपर्यंत २४२.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. साधारण १ जून ते २७ जुलै या कालावधीत येथे २८०.७ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. याचबरोबर राज्यातील सर्व चारही उपविभागांमध्ये पावसाची सामान्य स्थिती दिसून येत आहे.

आज पावसाचा अंदाज कुठे

अति मुसळधार पाऊस (ऑरेंज अलर्ट)

पुणे घाट परिसर

मुसळधार पाऊस (येलो अलर्ट)

रायगड, रत्नागिरी, सातारा घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर

उर्वरित भागात हलक्या सरींची शक्यता आहे.

मुंबईची स्थिती काय

मुंबईत आज आणि उद्या अधूनमधून हलक्या सरी बरसतील. मात्र, मागील काही दिवसांत जसा पाऊस पडला तसा पाऊस पडणार नाही. त्यानंतर साधारण बुधवारपासून पाऊस पडणार नाही. पावसाचे प्रमाण काहीसे कमी होईल.

मुंबईत जून, जुलैपेक्षा मे महिन्यात सर्वाधिक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यंदा मे महिन्यातच मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली होती. १ ते ३१ मे या कालावधीत ८८१.६ मिमी पावसाची नोंद झाली. यंदा हवामानातील बदलांमुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये मे महिन्यात नेहमीपेक्षा जास्त पडलेला वळवाचा पाऊस आणि त्यानंतर लवकरच दाखल झालेला मोसमी पाऊस यामुळे संपूर्ण मे महिन्यात ८८१.६ मिमी पावसाची नोंद झाली.मे मध्ये हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ५०३.२ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ३७८.४ मिमी पावसाची नोंद झाली. यापूर्वी १९१८ मध्ये १ ते ३१ मे दरम्यान २७९.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर तब्बल १०७ वर्षांनी यंदा मे महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.