मुंबईः राज्य प्रशासनात फेरबदल करण्यात आले असून रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम.देवेंद्र सिंग यांची बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवपदी करण्यात आली आहे. तर मनोज जिंदाल यांची रत्नागिरी जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हाधिकारीपदी आयुष प्रसाद, कुंभमेळा प्राधिकरणाच्या आयुक्तपदी शेखर सिंह तर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आयुक्तपदी जलाज शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रोहन घुगे यांची जळगाव जिल्हाधिकारीपदी, संजय कोलटे यांची साखर आयुक्तपदी तर माणिक गुरसाळ यांची राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे.