मुंबई : निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला धक्का!; अनेक शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश

आगामी काळात मुंबई महापालिका निवडणूक होणार असल्याने, सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे.

मुंबईमधील मीरा-भाईंदर व चांदीवली विधानसभा क्षेत्रातील अनेक शिवसैनिकांनी आज(गुरूवार) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवश केला. यावेळी मनसेचे ठाणे प्रमुख अविनाश जाधव, मीरा-भाईंदर शहर अध्यक्ष हेमंत सावंत, कामगार सेनेचे उपाध्यक्ष संदीप राणे यांच्यासह अनेक नेते व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आगामी काळात मुंबई महापालिका निवडणूक होणार आहे, त्या अगोदर शिवसेनेला सोडचिठ्ठी देत मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी मनसेमध्ये प्रवेश केल्याने, हा एकप्रकारे शिवसेनेला धक्का मानला जात आहे.

आगामी मुंबई मनपा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. सर्व पक्ष आपले संघटन अधिक बळकट करण्यासाठी जोरदार तयारीला लागले आहेत. आज मनसेमध्ये प्रवेश करणाऱ्या शिवसैनिकांमध्ये महिला कार्यकर्त्यांचा देखील मोठ्याप्रमाणावर समावेश होता.

दरम्यान, याप्रवेश सोहळ्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी माध्यमांशी बोलताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Many shiv sainiks joined mns msr

ताज्या बातम्या