मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही ब्लॉक नसेल.

मध्य रेल्वे

मुख्य मार्ग

  • कुठे : माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
  • कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ दरम्यान

परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकात डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. या लोकल माटुंगा – मुलुंडदरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद लोकल मुलुंड स्थानकात पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील.

ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ दरम्यान सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड स्थानकात अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल मुलुंड – माटुंगादरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील आणि माटुंगा स्थानकात पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील.

ट्रान्स हार्बर मार्ग

  • कुठे : ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर
  • कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान

परिणाम : ब्लॉक कालावधीत वाशी/नेरुळ – ठाणे स्थानकांदरम्यान अप व डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद असेल. ठाणे – वाशी/नेरुळ/पनवेल अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा रद्द असतील.

पश्चिम रेल्वे

  • कुठे : वसई रोड – भाईंदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर
  • कधी : शनिवारी रात्री १.१५ ते पहाटे ४.४५ दरम्यान

परिणाम : ब्लॉक कालावधीत विरार – भाईंदर/बोरिवली स्थानकांदरम्यान सर्व जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. या कालावधीत काही लोकल रद्द करण्यात येतील.