मुंबईच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर आज मेगाब्लॉक आहे. मध्य रेल्वेवर आठ तासांचा तर हार्बर मार्गावर सहा तासांचा ब्लॉक आहे. तर, पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान रविवारी सकाळी दहा वाजून 35 मिनिटे ते दुपारी तीन वाजून 35 मिनिटांपर्यंत अप आणि डाउन धीम्या मार्गावर जम्बोब्लॉक घोषित केला आहे. या ब्लॉकचा फटका लांबपल्ल्याच्या गाड्यांनाही बसला असून शनिवार आणि रविवारी मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस व मुंबई-भुसावळ पॅसेंजर रद्द करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य रेल्वेच्या परळ स्थानकात नव्या फलाटांसाठी रुळांच्या तांत्रिक कामांसाठी रविवारी सकाळी नऊ वाजता 30 मिनिटे ते पाच वाजून 30 मिनिटांपर्यंत आठ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान, धीम्या मार्गावरील लोकल भायखळा आणि माटुंगा स्थानकादरम्यान जलद मार्गावर व माटुंगा स्थानकानंतर पुन्हा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. याशिवाय दिवा स्थानकात पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यासाठी शनिवारी रात्री 12 वाजून 45 मिनिटे ते सहा वाजून 25 मिनिटांपर्यंत सहा तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला.

तर, हार्बर मार्गावर रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकादरम्यान 11 वाजून 34 मिनिटे ते दुपारी चार वाजून 47 मिनिटांपर्यंत एकही लोकल धावणार नाही. चुनाभट्टी /वांद्रे ते सीएसएमटी अप हार्बर मार्गावरील वाहतूक 11 वाजून 10 मिनिटे ते चार वाजून 10 मिनिटांपर्यंत बंद असेल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Megablock on mumbais all thre railway lines
First published on: 17-06-2018 at 09:02 IST