मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन आणि मध्य रेल्वेवर रविवारी दिवसकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

Megablock, Central Railway,
रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
1878 summer special trains from Western Railway and 488 from Central Railway
पश्चिम रेल्वेवरून १,८७८ आणि मध्य रेल्वेवरून ४८८ उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या
Night mega block of Central Railway for two days
Megablock Update: मध्य रेल्वेचा दोन दिवसीय रात्रकालीन ब्लॉक
Chalisgaon, railway trains canceled,
चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द

मुख्य मार्ग

कुठे : विद्याविहार आणि ठाणेदरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेवर

कधी : रविवारी सकाळी ८ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथून सुटणाऱ्या / येणाऱ्या डाऊन आणि अप मेल / एक्स्प्रेस विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान अनुक्रमे डाऊन आणि अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.

हेही वाचा – मुंबई : संपादित जुन्या इमारतींचे मालक पुनर्विकासासाठी पुन्हा सक्रिय! म्हाडाच्या हलगर्जीचा रहिवाशांना फटका?

हार्बर मार्ग

कुठे : मानखुर्द ते नेरुळदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर

कधी : रविवारी सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते पनवेल / बेलापूर / वाशी अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते मानखुर्ददरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते संध्याकाळी ४.३० या कालावधीत ट्रान्स हार्बर / मुख्य मार्गावर प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा – मुंबई : २० महिन्यांत २५ हजारांहून अधिक रुग्णांना मदत, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमुळे दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांना दिलासा

पश्चिम रेल्वे

कुठे : बोरिवली ते भाईंदर अप आणि डाऊन मार्गावर

कधी : शनिवारी रात्री ११.३० ते पहाटे ४.४० वाजेपर्यंतपरिणाम : ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील सर्व लोकल विरार / वसई आणि बोरिवलीदरम्यान धीम्या मार्गावर धावतील.