मुंबई शहर सतत दहशतवाद आणि बॉम्बस्फोट धमक्यांच्या सावटाखाली असल्याचं चित्र आहे. अशातच आता मुंबई विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाच्या ई-मेलवर ही धमकी देण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
गुरूवारी छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाच्या ई-मेलवर टर्मिनल-२ बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. अन्यथा त्याबदल्यात १० लाख डॉलरची बिटकॉइनमध्ये मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू करण्यात आला आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दरम्यान, मंगळवारीही एका अज्ञात व्यक्तीनं मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून धमकी दिली होती. मुंबईत लवकरच मोठी घटना घडणार असल्याचं व्यक्तीनं फोनवर सांगितलं होतं. धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.