मुंबई : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये होणारी प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य रेल्वेने मुंबई-नागपूर-करमळी – तिरुअनंतपुरम, पुणे-नागपूर आणि दौंड-कलबुर्गी दरम्यान ३३२ उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -नागपूर- द्विसाप्ताहिक विशेष गाडी (५० फेऱ्या) गाडी क्रमांक ०२१३९ द्विसाप्ताहिक विशेष रेल्वेगाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ६ एप्रिल ते २९ जूनपर्यंत दर मंगळवारी आणि रविवारी रात्री १२.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०२१४० द्विसाप्ताहिक विशेष गाडी ६ एप्रिल ते २९ जूनपर्यंत दर मंगळवारी आणि रविवारी रात्री ८ वाजता नागपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. या रेल्वेगाडील दादर (फक्त ०२१३९ साठी), ठाणे, कल्याण, इगतपुरी (फक्त ०२१४० साठी), नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबा असेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -करमळी- साप्ताहिक विशेष गाडी (१८ फेऱ्या) गाडी क्रमांक ०११५१ साप्ताहिक विशेष गाडी १० एप्रिल ते ५ जूनपर्यंत दर गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री १२.२० वाजता सुटेल आणि त्याचदिवशी दुपारी १.३० वाजता करमळी येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०११५२ साप्ताहिक विशेष गाडी १० एप्रिल ते ५ जूनपर्यंत दर गुरुवारी करमळी येथून दुपारी २.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ३.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि येथे थांबा असेल.

लोकमान्य टिळक टर्मिनस – करमळी- साप्ताहिक विशेष (१८ फेऱ्या) गाडी क्रमांक ०११२९ साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी १० एप्रिल ते ५ जूनपर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता करमळी येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०११३० साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी ११ एप्रिल ते ६ जूनपर्यंत दर शुक्रवारी दुपारी २.३० वाजता करमळी येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि येथे थांबा असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकमान्य टिळक टर्मिनस -तिरुवनंतपुरम साप्ताहिक विशेष (१८ फेऱ्या)

गाडी क्रमांक ०१०६३ साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ३ एप्रिल ते २९ मेपर्यंत दर गुरुवारी दुपारी ४ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १०.४५ वाजता तिरुवनंतपुरम येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०६४ साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी ५ एप्रिल ते ३१ मेपर्यंत दर शनिवारी दुपारी ४.२० वाजता तिरुवनंतपुरम येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी रात्री १२.४५ वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बिंदूर, कुंदापुरा, उडुपी, सुरतकल, मंगळुरु, कासरगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरनुर, त्रिसूर, एर्नाकुलम, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलिक्करा, कायमकुलम आणि कोल्लम येथे थांबा असेल. तसेच, पुणे – नागपूर- पुणे साप्ताहिक अति जलद वातानुकुलित विशेष रेल्वेगाडीच्या ४८ फेऱ्या, दौंड-कलबुर्गी अनारक्षित विशेष रेल्वेगाडीच्या १८० फेऱ्या धावतील.