मुंबई : शीतपेयामतून गुंगीचे औषध देऊन ३६ वर्षीय महिलेवर अत्याचार करून त्याचे चित्रीकरण समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला कुर्ला पोलिसांनी अटक केली. आरोपीने पीडित महिलेकडून अनेक वेळा खंडणीच्या स्वरुपात दागिने घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा – मुंबई : ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिका : दोन्ही मार्गिकेच्या दैनंदिन प्रवासी संख्येत वाढ, आता ‘इतकी’ दैनंदिन प्रवाशी संख्या

हेही वाचा – मुंबई : पालिका आयुक्तांनी बोलावल्यानंतरही बैठकीला गैरहजर राहणे अधिकाऱ्याला महाग पडले; अनधिकृत बांधकामांना अभय देणे भोवले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तक्रारीनुसार, आरोपीने शीतपेयातून पीडित महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यावेळी आरोपीने महिलेचे चित्रीकरण केले होते. या चित्रफितीच्या माध्यमातून आरोपी पीडित महिलेला धमकावत होता. आरोपीने पीडित महिलेकडून सोन्याच्या बांगड्या, कर्णफुले व ब्रेसलेट असे सुमारे दीड लाख रुपयांचे किंमतीचे दागिने घेतले. तसेच कल्याण येथील खडवली येथे नेऊन पीडित महिलेला चार दिवस डांबून ठेवले. याप्रकरणी महिलेने केलेल्या तक्रारीननंतर ३० वर्षीय आरोपीला कुर्ला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात गुंगीचे औषध देणे, बलात्कार व खंडणी स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.