मुंबई: रविवारी रात्रीपासून मुंबईत मुख्यत्वे शहर भागात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबईतील अनेक भाग जलमय झाले असून किंग्ज सर्कल, दादर, ग्रॅण्टरोड मध्ये पाणी साचले आहे. अंधेरी सब वे बंद झाला आहे तेथे जवळपास दीड ते दोन फूट पाणी साचले आहे. सोमवारी सकाळी कामावर जायला निघालेल्या नोकरदारांचे चांगलेच हाल झाले.

सोमवारी सकाळी पडलेल्या पावसामुळे किंग्ज सर्कल, सायन परिसरात पाणी साचले. तर दादर पश्चिमेकडेही पाणी साचले होते. साचलेल्या पाण्यातूनच रेल्वे प्रवाशांना वाट काढावी लागत होती.

मुंबईत विशेषतः शहर भागात रस्ते पाण्याखाली गेले असून रस्त्याकडेची गटारे साफ केली की नाही असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. शहर उपनगरांतील रस्त्यांना नद्यांसदृश स्वरूप आले आहे. त्यातच आता तासाभरात मोठी भरती अपेक्षित आहे. तेव्हाही पावसाचा जोर कायम राहिला तर पाणी आणखी तुंबण्याची शक्यता आहे.

०८:०० ते ०९:०० वाजेपर्यंत पडलेला पाऊस

दक्षिण मध्य मुंबई

शिवडी कोळीवाडा – १२ मिमी,

गोखले रोड म्युनिसिपल शाळा – ११ मिमी

पूर्व उपनगर

कलेक्टर कॉलनी चेंबूर – १३ मिमी,

चेंबूर फायर स्टेशन – ०९ मिमी

पश्चिम उपनगर

सुपारी टँक आणि नारियलवाडी सांताक्रूझ – २५ मिमी

खार दांडा पाली हिल – २४ मिमी

वांद्रे पश्चिम – १८ मिमी

विलेपार्ले फायर स्टेशन – १५ मिमी

अंधेरी फायर स्टेशन आणि चकाला म्युनिसिपल शाळा – १४ मिमी

मालवणी फायर स्टेशन – १२ मिमी,

वर्सोवा पंपिंग स्टेशन – ११ मिमी.

पाणी साचल्यामुळे बेस्ट बसचे मार्ग वळवले

मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे बेस्ट बसचे मार्ग वळवावे लागले आहेत. सायन, गांधी मार्केट, वडाळा, हिंदमाता या ठिकाणी पाणी साचल्यामुळे हे मार्ग वळवण्यात आल्याचे बेस्ट प्रशासनाने सांगितले आहे.

गांधी मार्केट येथे पाणी भरल्यामुळे दोन्ही दिशेतील बसगाड्या सकाळी पावणे दहा वाजल्यापासून भाऊ दाजी मार्गाने परावर्तित करण्यात आलेल्या आहेत.

सायन रोड नंबर २४ वर पाणी भरल्यामुळे मार्ग क्रमांक ३४१ व ३१२ या अप दिशेतील बसगाड्या सायन मेन रोड चा सिग्नल येथून डावी कडे वळण घेऊन यु टर्न घेतील व पूर्ववत मार्गस्थ होतील.

वडाळा उड्डाणपुलाखाली पाणी साचल्याने बस मार्ग क्रमांक ११७ व १७४ च्या बस गाड्या नऊ वाजल्यापासून वडाळा चर्च मार्गे परावर्तित करण्यात आल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंदमाता येथे पाणी साचल्याने बस मार्ग क्रमांक ४०, २१२, ३६८ या दोन्ही दिशेमध्ये शारदा सिनेमा कडून साडे नऊ वाजल्यापासून परावर्तित करण्यात आले आहे.