मुंबई : एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत मराठा आंदोलकांनी आझाद मैदानाबाहेरील रस्त्यावर उतरल्याने या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. याचा परिणाम पूर्वमुक्त महामार्गावरील वाहतूक कोंडीवरही झाला. या मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने येणाऱ्या गाड्या अडकून पडल्या. त्यामुळे या मार्गावर गाड्यांच्या लांबच लांब रांग लागली होती.
ठाणे व पनवेलहून मुंबईमध्ये जलद गतीने येण्यासाठी पूर्वमुक्त महामार्ग हा सर्वात सोयीचा ठरला जातो. त्यामुळे या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात या मार्गावरून गाड्या मुंबईमध्ये येतात. मात्र सलग दोन दिवस मुंबईमध्ये मराठा आंदोलकांनी केलेल्या आंदोलनाचा फटका सलग दोन दिवस पूर्व मुक्त महामार्गावरील वाहतुकीला बसला आहे. मराठा आंदोलकांनी शनिवारी मुंबई महानगरपालिका परिसरात ठिय्या मांडल्याने या परिसरात येणाऱ्या विविध रस्त्यांवर आंदोलकांनी गाड्या उभ्या केल्या आहेत. तसेच लाखोंच्या संख्येने आलेल्या मराठा आंदोलकांमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीचा परिणाम मुंबई, ठाणे व पनवेलला जोडणाऱ्या पूर्वमुक्त महामार्गावर झाला आहे.
पूर्वमुक्त गाड्यांची रांग ही पी.डीमेलो रोडपासून जवळपास डॉकयार्ड रोडपर्यंत लांबच लांब रांग लागली आहे. या मार्गावर जवळपास दोन तासांहून अधिकवेळ गाड्या रखडल्या आहेत. या मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने येणाऱ्या गाड्या अडकून पडल्या. त्यामुळे या मार्गावर गाड्यांच्या लांबच लांब रांग लागली होती. त्यामुळे या मार्गावरून वेगाने कार्यालयात पोहचणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला होता.