Mumbai Local Women Sexual Assault: महाराष्ट्राची राजधानी मुंबईत एका ४० वर्षीय व्यक्तीने लोकल ट्रेनमध्ये २० वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चालत्या मुंबई लोकल ट्रेनच्या लेडीज डब्यात आरोपीने मुलीवर बलात्कार केला. ही घटना बुधवारी सकाळी घडली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मस्जिद बंदर स्थानकांदरम्यान सकाळी ७ वाजून २६ मिनिटांनी वाजता ही भीषण घटना घडली. प्राप्त माहितीनुसार पीडित तरुणी एकटीच प्रवास करत होती, तिने आरडाओरडा सुरू केल्यानंतर आरोपीने पळ काढल्याचे समजतेय

मीडिया रिपोर्टनुसार, मुंबईतील गिरगाव येथील रहिवासी असलेली ही तरुणी नवी मुंबईतील बेलापूरच्या दिशेने जात होती. ती परीक्षा देण्यासाठी लोकलने प्रवास करत होती. सदर घटनेनंतर तरुणीने रेल्वे सुरक्षा दलाकडे (आरपीएफ) जाऊन तक्रार दाखल केली होती त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरपीएफ आणि मुंबई पोलिसांनी पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला असता, मस्जिद स्थानकात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांचे फुटेज स्कॅन करून त्या व्यक्तीची ओळख पटलेली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, घटनेच्या आठ तासांनंतर आता आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी हा रोजंदारीवर काम करणारा मजूर असून त्याच्यावर बलात्काराच्या आरोपासह भारतीय दंड संहितेच्या (IPC) संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आली आहे.