मुंबई : मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हर हेड वायरमधील तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर, तसेच पश्चिम रेल्वेवर राम मंदिर ते बोरिवली अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

कुठे : माटुंगा ते ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर 

Megablock, Central Railway,
रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
Block. Konkan Railway, trains,
कोकण रेल्वेवर ब्लॉक; रेल्वेगाड्यांचा खोळंबा
Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
rail line to Karjat
कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग, पनवेल – कर्जत रेल्वे मार्ग डिसेंबर २०२५ पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य

कधी : सकाळी ११ .०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा ते ठाणे  स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. पुढे ठाणे स्थानकावर धिम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. ठाणे येथून अप धीम्या मार्गावरील लोकल ठाणे ते माटुंगादरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबतील.

हार्बर रेल्वे

कुठे : सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर

कधी :  सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील सीएसएमटी /वडाळा ते वाशी / बेलापूर / पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. सीएसएमटी ते वांद्रे / गोरेगाव अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. 

पश्चिम रेल्वे

कुठे : बोरिवली ते राम मंदिर अप आणि डाऊन जलद मार्गावर 

कधी : सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत परिणाम : ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल अंधेरी ते बोरिवलीदरम्यान धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. ब्लॉक काळात काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.