मुंबई : शांततेच्या मार्गाने निवेदन देण्यासाठी आलेल्या मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बळाचा वापर करून ताब्यात घेतल्याचे तीव्र पडसाद उमटले. आम्ही लोकशाही मानणारे आणि मवाळपणे भूमिक मांडत असतो. पण अशा प्रकारे आमचे आंदोलन चिरडणे हे दुर्देवी आहे. यापुढे आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा महाराष्ट्र एकीककरण समितीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

दादर कबुतरखान्यासंदर्भातील निर्णय न्यायालयाचा होता. मात्र त्याच्याविरोधात गुजराथी आणि जैन समाजाने हिंसक आंदोलन केले. हातात शस्त्र घेण्याची भाषा वापरली गेली होती. त्यामुळे केवळ पोलीस उपायुक्तांना निवेदन देण्याचे मराठी एकीकरण समितीतर्फे ठरविण्यात आले होते. त्यानुसार मुंबई, ठाणे, पालघरमधील मराठी एकीककरण समितीचे कार्यकर्ते जमले होते. परंतु पोलिसांनी अत्यंत वाईट वागणून देत ताब्यात घेतले. त्याबाबल कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

हा नक्की महाराष्ट्र आहे का ?

आम्ही निशस्त्र आहोत. लोकशाहीला मानणारे आहोत. फक्त न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करा एवढेच सांगायला आलो, तरी आम्हाला गुन्हेगारासारखी वागणूक देण्यात आली आहे. हा खरच महाराष्ट्र आहे का ? आमचे आंदोलन मुंबईतच आहे का ? असा प्रश्न पडल्याची उद्वीग्न प्रतिक्रिया निनाद सावंत यांनी दिली. सरकार मराठी माणसाची कशी गळचेपी करण्यात येते त्याचे हे उदाहरण असल्याचे सावंत यांनी सांगितले.

आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका

आम्ही राजकारण करत नाही. शाततेने मराठी अस्मिता आणि मराठी माणसासाठी संघर्ष करीत आहोत. पण आज जी वागणूक दिली ती अत्यंत निंदनयी आहे. सरकारने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा इशारा एकीकरण समितीचे कार्यकर्ते ॲड सागर पाटील यांनी दिला आहे. पोलिसांची दादागिरी आणि दंडेलशाही खूप भयंकर होती. एका भगिनीला दुखापत झाली. आम्हाला गुन्हेगारासारखे वागवणार असलात, तर आम्ही गप्प बसणार नाही, असेही ते म्हणले. एकत्र जमून निषेध करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. जैन नागरिक हिसंक होते, तेव्हा गप्प बसलात आणि आज आमच्यावर दांडुके उगारत आहात, असेही कार्यकर्त्यांनी सांगितले. आम्ही मागे हटणार नाही, असा इशारही कार्यकर्त्यांनी दिला.