मुंबई : आर्थिक संकटात सापडलेल्या बेस्ट उपक्रमाच्या मदतीला पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेने धाव घेतली आहे. बेस्ट उपक्रमाने दैनंदिन कामकाज चालविण्यासाठी घेतलेल्या अल्प मुदतीच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. महानगरपालिकेने बेस्टला ४५० कोटी रुपये दिले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून बेस्ट उपक्रमाचा तोटा सतत वाढत आहे. काही वर्षांपूर्वी आर्थिक संकटात सापडलेल्या उपक्रमाला आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर देता येत नव्हते. तसेच वेतन देण्यासाठी कर्जही घ्यावे लागले होते. मुंबई महानगरपालिकेने वेळोवेळी बेस्ट उपक्रमाला आर्थिक मदतीचा हात दिला आहे. आता पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिका बेस्टच्या मदतीला धावली  आहे. दैनंदिन खर्च भागविण्यासाठी बेस्ट उपक्रमाला अल्प मुदतीचे कर्ज घ्यावे लागले आहे. मुंबई महानगरपालिकेने नोव्हेंबर, डिसेंबर २०२२ आणि जानेवारी २०२३ या तीन महिन्यांसाठी बेस्ट उपक्रमाला प्रत्येकी १५० कोटी रुपये उपलब्ध केले आहेत.

navi mumbai municipal corporation steps taken to prevent accidents at tandel maidan chowk in seawoods
वाहतूक बेटासह चौकाचे काँक्रीटीकरण; सीवूड्स येथील तांडेल मैदान चौकात अपघातापासून बचावासाठी महापालिकेचे पाऊल
Mumbai, parks, misused, mnc,
मुंबई : १२ उद्यानांचा गैरवापर होत असताना पालिकेची डोळेझाक
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
road work contractor marathi news, mumbai municipal corporation marathi news
मुंबई: शहर भागातील कामे रखडवणाऱ्या कंत्राटदाराकडून अद्याप दंड वसुली नाही, एक महिन्याची मुदत संपूनही मुंबई महापालिकेची चालढकल

हेही वाचा >>> मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावर अपघातांमध्ये वाढ, दोन वर्षात तब्बल इतक्या मृत्यूंची नोंद

अल्प मुदतीच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी ४५० कोटी रुपये आणि टाटा पॉवर कंपनीची प्रलंबीत विद्युत देणी देण्यासाठी एक हजार ७७४ कोटी रुपये असे एकूण दोन हजार २२४ कोटी रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी बेस्ट उपक्रमाने मुंबई महानगरपालिकेकडे गेल्यावर्षी केली होती. बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन २०१९-२० पासून २०२२-२३ या आर्थिक वर्षांत सहा हजार ३३ कोटी ८५ लाख रुपयांचे अधिदान करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> मुंबई : सायबर पोलिसांनी वाचवले साडेसात लाख रुपये

निवृत्त कर्मचाऱ्यांची देणे देण्यासाठीएकूण ९३२ कोटी रुपये आणि अल्प मुदतीच्या कर्जांच्या परतफेडीसाठी ४५० कोटी रुपये देण्यात आले आहेत. या रक्कमेचा सविस्तर अहवाल मुंबई महानगरपालिकेला सादर करणे बंधनकारक आहे. यापैकी अल्प मुदतीच्या कर्जाच्या रक्कमेचा अहवाल तीन महिन्यात आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या देणी देण्याच्या रकमेचा अहवाल एका महिन्यात सादर करण्याची मुदत बेस्टला देण्यात आली आहे.