नालासोपारा येथील ४० वर्षीय व्यक्तीचे अपहरण करणाऱ्या चार जणांना मुंबई पोलिसांनी अखेर अटक केली. गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलीस या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत होते. विशेष म्हणजे कारवारील स्टिकरवरून मुंबई पोलिसांना अपहरणकर्त्यांचा सुगावा लागला आहे. दरम्यान, या घटनेमागे सुत्रधार कोण आहेत, याबाबतचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.

हेही वाचा – रेल्वे स्थानकांचे घाऊक नामांतर; मंत्रिमंडळात आज चर्चा, बाळासाहेबांच्या नावाबाबत संभ्रम

‘द इंडियन एक्सप्रेस’ने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात नालासोपारा येथील ४० वर्षीय व्यक्ती तळोजा येथे आपल्या नातेवाईकांना भेटायला जात असताना वाटेत त्याचे अपहरण करण्यात आले होते. मात्र, काही वेळातच तो व्यक्ती अपहरणकर्त्यांना तावडीतून पळून जाण्यात यशस्वी ठरला. त्यानंतर त्याने देवनार पोलिसांत अपहरणकर्त्यांविरोधात तक्रार दाखल होती. या तक्रारीत आरोपींच्या गाडीवर ‘अलिझा’ नावाचे स्टीकर असल्याचे त्याने पोलिसांनी सांगितले.

या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला. यावेळी पोलिसांनी या भागातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यांना ‘अलिझा’ नावाचे स्टीकर असलेली गाडी आढळून आली. अखेर पोलिसांनी या गाडीचा शोध घेत, मंगळवारी चार आरोपींना पकडले. अब्दुल दरजी (४२), राजकुमार यादव (३०) मुजीब शेख (३८) आणि साहिल शेख (४९) अशी या आरोपींची नावे आहेत. हे चारही आरोपी बांधकाम क्षेत्रात काम करत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा – कोनमधील घरांचे सेवाशुल्क कमी करा,संतप्त विजेत्यांची म्हाडावर धडक; १८ मार्चला संयुक्त बैठक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीने आरोपींकडून पैसे उधार घेतले होते. त्यानंतर आरोपींनी वारंवार पीडित व्यक्तीला पैसे परत करण्याची विनंती केली. मात्र, त्याने पैसे परत न केल्याने आरोपींना अपहरणाचा कट रचला.