Mumbai News Updates: वाढवण बंदर, नवी मुंबई विमानतळ आणि तिसरी मुंबई यामुळे भविष्यात मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ होणार आहे. हे लक्षात घेता द्रुतगती महामार्गाला समांतर आणखी एक द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) घेतला आहे. तसेच राज्यातील जनतेने २०१९ मध्ये भाजप-शिवसेना युतीला जनादेश दिला होता, पण त्यावेळी चपट्या पायाचे लोक राजकारणात असल्यामुळे त्यांनी हिंदुत्वाशी दगाबाजी केली. त्यामुळे आमचे सरकार येऊ शकले नाही, अशी टीका मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता आज येथे केली. अशा विविध क्षेत्रातील मुंबई, मुंबई महानगर, पुणे -नागपूर शहर आणि परिसरातील महत्वाच्या विविध ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या…

Live Updates

Mumbai Pune Nagpur Latest News  Updates in Marathi : महत्त्वाच्या घडामोडींची माहिती एका क्लिकवर...

21:32 (IST) 4 Aug 2025

वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांची ईडीकडून चौकशी; पवार व त्यांच्या पत्नीचा जबाब नोंदवला

ईडीने याप्रकरणी पवार यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणी छापे टाकले. त्यात एक कोटी ३३ लाख रुपये व कागदपत्रे जप्त करण्यात आली होती ...अधिक वाचा
21:14 (IST) 4 Aug 2025

उत्सवाच्या काळात रस्त्यांकडे लक्ष; महापालिकेकडून महत्वाच्या रस्त्यांची अभियंत्यांवर जबाबदारी

प्रत्येक अभियंत्यावर जबाबदारी निश्चित करुन संबधित रस्त्यावर उत्सवाच्या काळात खड्डे पडू नयेत, यासाठी विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...सविस्तर वाचा
21:02 (IST) 4 Aug 2025

पिंपरी-चिंचवडमधील बस थांब्यांची दुरवस्था

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस धावतात. शहरातील बीआरटीच्या ९२ थांब्यांसह इतर मार्गांवरील बस थांब्यांची अवस्था फारच बिकटआहे. ...वाचा सविस्तर
20:43 (IST) 4 Aug 2025

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीत फक्त ३२ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

सीईटी कक्षामार्फत अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीसाठी ३१ जुलै रोजी निवड यादी जाहीर करण्यात आली. ...सविस्तर वाचा
20:32 (IST) 4 Aug 2025

आंतरजातीय विवाह केल्याने नातेवाईकांकडून महिलेचे अपहरण; पोलिसांकडून महिलेची सुटका; भावासह १५ जणांवर गुन्हा

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित दाम्पत्याचा ५ ऑगस्ट २०२४ रोजी आंतरजातीय विवाह झाला. विवाहाला महिलेच्या कुटुंबाचा विरोध होता. ...वाचा सविस्तर
20:24 (IST) 4 Aug 2025

पोषण आहारातून विषबाधा झाल्यास पुरवठादारावर कारवाई

पोषण आहारातून विषबाधा झाल्यास कारवाईचे स्वरूप निश्चित करण्यात आले असून, तपासणीवेळी पुरवठादाराचे गोदाम अस्वच्छ आढळल्यास पहिल्या वेळी ५० हजार रुपये, तर दुसऱ्या वेळी एक लाख रुपये दंड केला जाणार आहे. ...सविस्तर बातमी
20:08 (IST) 4 Aug 2025

हर्बल हुक्का पुरवणाऱ्या रेस्टॉरंटवर कारवाई; संरक्षणाच्या मागणीसाठी १२ रेस्टॉरंट मालकांची उच्च न्यायालयात धाव

राज्याच्या गृह विभागाने ६ जून रोजी एक परिपत्रक काढले होते. त्यात बेकायदेशीर हुक्का पार्लरविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. ...सविस्तर बातमी
20:00 (IST) 4 Aug 2025

दप्तराचे ओझे वाढतेच; नियमावलीची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी

केंद्र सरकारने २००६ मध्ये विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली होती. त्यानुसार दप्तराचे ओझे मुलांच्या वजनाच्या दहा टक्क्यांपर्यंत असावे, अशी तरतूद आहे. ...सविस्तर वाचा
19:27 (IST) 4 Aug 2025

‘खारीचा वाटा’ म्हणून पीएमपी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपातीच्या निर्णयाला स्थगिती

या निर्णयाविरोधात कामगार संघटना आक्रमक झाल्या होत्या. तसेच पीएमपी राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेने या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. ...सविस्तर वाचा
19:15 (IST) 4 Aug 2025

अतिधोकादायक इमारत दुर्घटना…अंदाजे अडीच हजार कुटुंबांचा जीव मुठीत; अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना...

यंदा दुरुस्ती मंडळाने केलेल्या पावसाळापूर्व सर्वेक्षणात ९६ इमारती अतिधोकादायक स्थितीत आढळल्या. या इमारतींमधील रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. ...अधिक वाचा
19:12 (IST) 4 Aug 2025

ग्रँडमास्टर दिव्या देशमुखच्या रक्तातच बुद्धीबळ -पणजोबा खेळायचे विनोबा भावेंसोबत बुद्धीबळ

दिव्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी पुढे यायला लागल्या आहेत. ग्रँडमास्टर दिव्या देशमुखला बुद्धीबळ स्पर्धेची आवड कुठून निर्माण झाली असाही प्रश्न अनेकांना पडतो. याचे उत्तर म्हणजे दिव्याच्या रक्तातच बुद्धीबळ असल्याची माहिती समोर आली आहे. ...सविस्तर बातमी
18:31 (IST) 4 Aug 2025

दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबीयांना ७५ लाखांची नुकसान भरपाई

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराच्या मागे पत्नी, दोन मुले, आई-वडील असा परिवार आहे. ...सविस्तर बातमी
18:07 (IST) 4 Aug 2025

नव्या नंबर प्लेटला थंड प्रतिसाद; राज्यात सुमारे ८० टक्के वाहनांना अजूनही उच्च सुरक्षा क्रमांक पाटी नाही

केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशांनुसार, एक एप्रिल २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी लावण्याबाबत परिवहन विभागाकडून डिसेंबर २०२४ मध्येच आदेश काढून अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली. ...सविस्तर वाचा
17:55 (IST) 4 Aug 2025

फडणवीसांना सरन्यायाधीशांनी मंचावरूनच सांगितली ‘चूक’, म्हणाले, ‘दुरुस्त करा...’

एक कार्यक्रम संविधान पार्कच्या उद्घाटनाचा होता तर दुसरा कार्यक्रम महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा होता. विधी विद्यापीठाच्या कार्यक्रमात सरन्यायाधीशांनी फडणवीस मंचावर असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोव्हिड काळात केलेल्या कार्याचे कौतूक केले होते. ...सविस्तर वाचा
17:52 (IST) 4 Aug 2025

विसर्जन मिरवणूक सकाळी साडेसातला सुरू करा; पुणे शहर गणेशोत्सव समितीची मागणी

मुख्य मिरवणूक नेहमीच्या वेळेनुसार सुरू होणार असेल, तर लक्ष्मी रस्त्यावरून अन्य मंडळांना मिरवणूक सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी प्रशासनाकडे मागणी करण्याचा निर्णय मंडळांनी घेतला. ...अधिक वाचा
17:39 (IST) 4 Aug 2025

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या ‘टॅरिफ’ हल्ल्यावर गडकरींचे मोठे विधान, सुचविला ‘हा’ उपाय…

ट्रम्पच्या ‘पेनाल्टी टॅरिफ’ या निर्णयाचा भारताच्या उद्योगांवर परिणाम कमी करण्यासाठी गडकरींनी एक महत्वपूर्ण उपाय देखील सुचविला आहे. ...वाचा सविस्तर
17:26 (IST) 4 Aug 2025

Eknath Shinde : ठाण्यातील वाहतुक कोंडीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी, म्हणाले….

ठाणे जिल्ह्यातील विशेषत: घोडबंदर मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दररोज वाहन चालकांना प्रचंड कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. वाहतुक कोंडीमुळे नोकरदारांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता येत नाही. ...वाचा सविस्तर
17:20 (IST) 4 Aug 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘नाराज’ का झाले? -स्वत: गडकरींनी केला खुलासा..

नितीन गडकरी हे संघटनेतील पारंपरिक विचारसरणीचे, 'संघ शैली'तून पुढे आलेले आणि अनेकदा थेट बोलणारे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी वारंवार सांगितले आहे की, “नेता म्हणजे तो जो जबाबदारी घेतो, क्रेडिट नाही”, हे विधान मोदींच्या कार्यशैलीवर अप्रत्यक्ष टोला मानले गेले. ...सविस्तर बातमी
17:02 (IST) 4 Aug 2025

स्मार्ट मीटरबाबत मोठी बातमी… एकाच दिवसात १.६० लाख मीटर 'फेल'… वीज कामगार संघटना म्हणते…

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने एकाच दिवशी १.६० लाख मीटरमध्ये तांत्रिक बिघाड ( फेल) झाल्याचा दावा केला. ...वाचा सविस्तर
16:46 (IST) 4 Aug 2025

महसूल मंत्री बावनकुळेंच्या प्रतिमेला जोडे मारले; ‘त्या’ वक्तव्यावरुन प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक…

शेतकऱ्यांच्या वेदनेला ‘नौटंकी’ म्हणणं म्हणजे कष्टकरी शेतकऱ्यांच्या भावनांचा अनादर करणे आहे, हे सरकार शेतकरी विरोधी धोरण राबवत असल्याचे बावनकुळे वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. ...अधिक वाचा
16:42 (IST) 4 Aug 2025

मानकापूर उड्डाण पुलावरून तरुणाने घेतली उडी

हा तरुण सावनेरच्या दिशेने उड्डाणपुलावरुन सदरकडे जात होता. पागलखाना चौकाजवळ पोचताच त्याने गाडी उड्डाणपुलावरच थांबवली. ...वाचा सविस्तर
16:20 (IST) 4 Aug 2025

नाल्याशेजारीच गाळ, कचऱ्याचे ढीग, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने काँग्रेस नेत्यांनी केली पालिकेकडे ‘ही’ मागणी

दोन महिन्यांचा काळ लोटल्यानंतरही नालेसफाईच्या कामावरून टिका होत असून ठाण्यातील काँग्रेस नेत्यांनी नालेसफाईच्या कामावरून पालिका प्रशासनाच्या कारभारावर बोट ठेवत आरोप केले आहेत. ...वाचा सविस्तर
16:20 (IST) 4 Aug 2025

नाल्याशेजारीच गाळ, कचऱ्याचे ढीग, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने काँग्रेस नेत्यांनी केली पालिकेकडे ‘ही’ मागणी

दोन महिन्यांचा काळ लोटल्यानंतरही नालेसफाईच्या कामावरून टिका होत असून ठाण्यातील काँग्रेस नेत्यांनी नालेसफाईच्या कामावरून पालिका प्रशासनाच्या कारभारावर बोट ठेवत आरोप केले आहेत. ...वाचा सविस्तर
15:21 (IST) 4 Aug 2025

हातात खेळण्यातील बंदुका घेऊन अनोखे आंदोलन; अमरावतीत युवा स्वाभिमान पक्षाने...

आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...वाचा सविस्तर
15:15 (IST) 4 Aug 2025

डोंंबिवलीच्या विकासाला ग्रहण लावणाऱ्या ‘चाँदभाई’चे नाव घ्या; राजू पाटील यांचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना आवाहन

राजू पाटील यांनी प्रथमच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना रविवारच्या विधानावरून विकासाचे ग्रहण डोंबिवली, कल्याणला कोणी लावले त्या चाँदभाईचे नाव घेण्यासाठी आवाहन केले आहे. ...सविस्तर बातमी
14:50 (IST) 4 Aug 2025

पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या खुल्या प्रवर्गातील हजारो अधिकार्‍यांना फटका; ८४ पोलीस अधिकाऱ्यांची ‘मॅट’मध्ये याचिका

पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या खुल्या प्रवर्गातील ५०० हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांसह राज्य शासनातील हजारो अधिकाऱ्यांना भविष्यात फटका बसणार आहे. ...सविस्तर वाचा
14:34 (IST) 4 Aug 2025

मुंबईत कबुतरांच्या बाजूने मंत्र्यांची उडी, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आयुक्तांना पत्र

कबुतरांना खाद्य देणे हेच आरोग्य समस्यांचे मूळ कारण आहे का, की वाढते पर्यावरणीय प्रदूषण हे अधिक मोठे कारण आहे, असा प्रश्न लोढा यांनी नागरिकांतर्फे प्रशासनाला विचारला आहे. ...अधिक वाचा
14:26 (IST) 4 Aug 2025

Video : भायखळ्यात डाक कार्यालयाच्या इमारतीचा भाग कोसळला

रविवारी मध्यरात्री इमारतीच्या पहिल्या आणि तिसऱ्या मजल्यामागील भाग कोसळला. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. ...सविस्तर वाचा
14:21 (IST) 4 Aug 2025

कल्याण : अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी नारायण माने

नारायण माने हे डोंंबिवली एमआयडीसीतील इंडो अमाईन्स केमिकल कंपनीचे संस्थापक संचालक आहेत. दीपक विश्वनाथ यांची वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. ...वाचा सविस्तर
14:08 (IST) 4 Aug 2025

कबुतरांमुळे वाढणाऱ्या आजारांची नवी चिंता! टॉवरमध्ये राहाणारे लोकही श्वसनविकारांनी त्रस्त…

कबुतरांनी केलेली घरटी आणि साचलेली विष्ठा यामुळे ‘हायपरसिटीव्हिटी न्यूमोनायटिस’, ‘क्रिप्टोकॉक्कोसिस’ ‘बर्ड फॅन्सियर्स लंग’ अशा अनेक दुर्मिळ पण जीवघेण्या फुफ्फुसाच्या आजारांमध्ये वाढ होत असल्याचे वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट झाले आहे. ...सविस्तर बातमी

Today’s Nagpur Mumbai Pune News Live Updates in Marathi

मुंबई पुणे नागपूर न्यूज  ४ ऑगस्ट २०२५