Mumbai News Live Updates, 21 July 2025 मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये ११ जुलै २००६ रोजी घडवण्यात आलेल्या साखळी बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यातील सर्वच्या सर्व १२ आरोपींना सत्र न्यायालयाने सुनावलेली शिक्षा उच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केली. या १२ पैकी पाच आरोपींना फाशीची शिक्षा, तर उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. न्यायालयाने या सर्व आरोपींबाबतचा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करून त्यांची तातडीने सुटका करण्याचे आदेश दिले.
तसेच मुंबईत काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. मुंबई शहर तसेच उपनगरात रविवारी सायंकाळनंतर पावसाला सुरुवात झाली. आज पहाटेपासून पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, मुंबईत पुढील काही तासांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच दिवसभर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे, नागपूर जिल्ह्यातील ताज्या बातम्या या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.
Pune Mumbai Nagpur Live News Updates in Marathi
पुण्यात वडिलांनी मुलाचा केला खून; आरोपी वडीलांना पोलिसांनी केली अटक
डोंबिवलीत आरोग्यवर्धिनी दवाखान्यासाठी गाळा भाड्याने देणाऱ्या कडोंमपातील फार्मासिस्टवर कारवाईची मागणी
कृषिमंत्री माणिक कोकाटे यांच्यामुळे अजित पवार पुन्हा अडचणीत
अण्णा डांगे स्वगृही परतणार
डोंबिवलीतील सेवाभावी डाॅक्टर श्रीराम कुलकर्णी यांचे निधन
Video : जामिनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला...
घोडबंदरमधील गायमुख घाटात वाहतुक कोंडी
२००६ रेल्वे बॉम्बस्फोट : मुंबईची जीवनवाहिनी थांबली
सत्तेचा इतका माज बरा नव्हे..! राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची सरकारवर टीका
पुणे: शहरातील मद्य विक्री दुकाने चोरट्यांचे ‘लक्ष्य’, मद्य विक्री दुकाने फोडून रोकड चोरीचे प्रकार वाढीस
पुण्यात बनावट मद्याची तस्करी, पाच ठिकाणी छापे; पाच जण अटकेत
मातामृत्यू विश्लेषणाप्रमाणे क्षयरोग मृत्यू विश्लेषण गरजेचे!
बालकाच्या अंगावर कुत्रे सोडले; कुत्रा चावा घेत असताना चित्रफित केली
अजित पवार गटावर शेतकरी विरोधी ठपका
प्रवेश प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी सीईटी कक्षाकडून शिक्षकांना मार्गदर्शन
नवी मुंबई महापालिकेच्या ६६८ जागांसाठी ८४७७४ पैकी ६८१४९ उमेदवारांनी दिली परीक्षा !
हिंजवडीतील ओढ्यांवरील इमारती पाडण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश
हिंजवडीतील नागरी समस्यांसंदर्भात गेल्या आठवड्यात अजित पवार यांनी पाहणी केली होती.
शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय… शाळा, शिक्षकांसाठी ठरणार दिलासादायी
कल्याण पश्चिम कर्णिक रोडचा वीज पुरवठा मंगळवारी पाच तास बंद
मुंबईत पावसाचा जोर; पुढील काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता
अंधेरी, घाटकोपर, कुर्ला, पवई, दादर, वरळी, प्रभादेवी या भागात पहाटेपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.
7/11 Mumbai Local Blast: सर्वच्या सर्व १२ आरोपींची १९ वर्षांनंतर निर्दोष सुटका
या १२ पैकी पाच आरोपींना फाशीची शिक्षा, तर उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. न्यायालयाने या सर्व आरोपींबाबतचा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करून त्यांची तातडीने सुटका करण्याचे आदेश दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बांबू फर्निचरची इस्रायलला निर्यात
सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्तम दर्जाच्या बांबूचे उत्पादन होते. याच भागात कोनबॅक आणि चिवार या बांबू प्रक्रिया क्षेत्रातील नावाजलेल्या संस्था आहेत.
रत्नागिरी : वाटद औद्योगिक वसाहतीचा वाद शिगेला पोहोचला
वाटद औद्योगिक वसाहती (एमआयडीसी ) विरोधात ग्रामस्थांचा भव्य मोर्चा काढण्यात आला.
आषाढी वारीनिमित्त पंढरपूरहून विठ्ठलाचे दर्शन घेऊन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सायंकाळी साडेसहा वाजता आळंदीत दाखल झाली.
पुणे: गणेशोत्सवात पोलिसांकडून एकतर्फी निर्बंध नाहीत, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आश्वासन
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा पारिषोतिक वितरण समारंभ रविवारी झाला.
मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह २१जुलै २०२५