Mumbai Live Updates, 24 July 2025: मुंबई शहरातील शाळांना धमकीचे ई-मेल येण्याचे सत्र सुरूच असून अलिकडेच कुर्ला येथील आंतरराष्ट्रीय शाळेला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला आहे. ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने शाळेच्या परिसरात अनेक बॉम्ब पेरल्याचा दावा केला होता. शाळा प्रशासनाने धमकीच्या या ई-मेलबाबत तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यातील पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (बीडीडीएस) घटनास्थळी धाव घेऊन शाळेची तपासणी केली.

गेल्या आठवड्यात विधान परिषदेच्या कामकाजाच्या वेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे मोबाईलवर रमी खेळत असल्याचे वादग्रस्त ठरलेले चित्रीकरण कोणी केले असावे याची चौकशी विधिमंडळ सचिवालयाने सुरू केली आहे.कोकाटे हे सभागृहाचे कामकाज सुरू असताा दुपारी १.३१ ते १.५१ या काळात भ्रमणध्वनीवर रमी खेळत असल्याची चित्रफीत राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी समोर आणली आहे. यावरून कोकाटे हे वादग्रस्त ठरले आहेत. 

या घडामोडींसह मुंबई,  मुंबई महानगर, नागपूर आणि पुणे शहर परिसरातील ताज्या बातम्या एका क्लिकवर जाणून घ्या…

Live Updates

Pune Nagpur Mumbai Breaking News Live Updates in Marathi

18:05 (IST) 24 Jul 2025

Abu Azmi: 'घरातील महिला, वृद्धांचा छळ करून पोलिसांनी कबुली जबाब घेतला', मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींबाबत अबू आझमींचे मोठे विधान

Abu Asim Azmi comment on 2006 Mumbai train blasts case: २००६ साली मुंबईत पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ...सविस्तर वाचा
16:08 (IST) 24 Jul 2025

मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक ‘ई-कंटेंट’ स्टुडिओ आणि सभागृह; मॉस्को राज्य विद्यापीठाच्या सहकार्याने सुविधा

दर्जेदार शैक्षणिक सामग्रीच्या निर्मितीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या दोन्ही सुविधा मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील शंकरराव चव्हाण शिक्षक प्रशिक्षण अकादमी इमारतीत कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. ...अधिक वाचा
15:49 (IST) 24 Jul 2025

चिकन आणि चायनीज न दिल्याने महिलेवर लोखंडी सळईने हल्ला; आरोपी पती अटकेत

भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ (हत्येचा प्रयत्न), ११५ (२) (हिंसा), ३५२ (मारहाण), आणि ३ (५) (सामूहिक हेतू) या कलमांतर्गत अज. विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...वाचा सविस्तर
15:48 (IST) 24 Jul 2025

या शहरांमध्ये लहान मुलांच्या जीवाशी खेळ… प्रशासनाचे धोरणात्मक पाऊल

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये १० हजार ८०० बस आणि व्हॅन यांना आरटीओकडून परवानगी देण्यात आली आहे, तर दोन हजार १६२ वाहनधारकांनी अद्याप वाहन स्वास्थ्य तपासणी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. ...वाचा सविस्तर
15:26 (IST) 24 Jul 2025

अभियांत्रिकीची निवड यादी ३१ जुलै रोजी, तर विधि पाच वर्ष अभ्यासक्रमाची निवड यादी ६ ऑगस्ट रोजी

अभियांत्रिकी अभ्याक्रमाची निवड यादी ३१ जुलै रोजी, तर विधि पाच वर्ष अभ्यासक्रमाची निवड यादी ६ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. ...अधिक वाचा
15:23 (IST) 24 Jul 2025

गोळीबार प्रकरणात भावावर गुन्हा, आमदार म्हणतात "मीच पोलीस स्टेशनमध्ये… "

आमदार शंकर मांडेकर म्हणाले,मी सामाजिक आणि राजकीय जीवनात बर्‍याच वर्षापासून आहे.मी आजवर कधीच चुकीच्या कामांना थारा दिला नाही.ही बाब माझ्या तालुक्यातील सर्व नागरिकांना माहिती आहे. ...सविस्तर वाचा
14:49 (IST) 24 Jul 2025

क्यूआर कोड स्कॅन करा; व्हीआयपी दर्शन घ्या! तीर्थक्षेत्र श्री भीमाशंकरसाठी जिल्हा प्रशासनाचा उपाय

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असेल्या भीमाशंकरच्या (ता. आंबेगाव) विकास आराखड्याची अंमलबजावणी तातडीने सुरू करून कुंभमेळ्याच्या आधी या क्षेत्राचा सुनियोजितपणे दर्जेदार विकास करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहे. ...सविस्तर वाचा
14:30 (IST) 24 Jul 2025

मोठ्या झोपडपट्ट्या संमतीविना विकासकांना खुल्या! गृहनिर्माण धोरणात शिक्कामोर्तब

दहा एकर किंवा त्यापेक्षा अधिक भूखंडावर पसरलेल्या झोपु योजना तीन-क नुसार झोपडीवासीयांच्या संमतीविना थेट देण्याचे अधिकार शासनाला प्राप्त झाले आहेत. ...सविस्तर बातमी
14:22 (IST) 24 Jul 2025

अग्निशमन दलाच्या गाड्यांना अडथळा ठरणाऱ्या वाहनांच्या मालकाविरोधात पोलीस तक्रार…; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा इशारा

आगीची दुर्घटना घडल्यानंतर घटनास्थळी पोहोचताना अग्निशमन दलाच्या वाहनांना अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांच्या मालकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करावी, असे निर्देश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. ...सविस्तर बातमी
14:12 (IST) 24 Jul 2025

कलानगर जंक्शन आणि वाकोल्यातील नवीन पूल १० दिवसात खुले करा, अन्यथा…

वांद्रे-कुर्ला संकुल आणि कलानगर जंक्शन येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कलानगर जंक्शन येथे तीन उड्डाणपुलाचे काम एमएमआरडीएने हाती घेतले होते. ...सविस्तर वाचा
13:56 (IST) 24 Jul 2025

Video : तीन तरुणींची चालत्या वाहनातून स्टंटबाजी…चित्रफीतीवरून पोलिसांची कारवाई

मालाड परिसरात बुधवारी रात्री भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनाच्या छतावरील दरवाज्यातून (सनरूफ) बाहेर येऊन धोकादायक नृत्य करणाऱ्या तीन तरुणींची एक चित्रफित समाजमाध्मयावर व्हायरल झाली होती. ...अधिक वाचा
13:19 (IST) 24 Jul 2025

गडचिरोलीत ‘सर्च’च्या माध्यमातून मणक्याच्या ५०० शस्त्रक्रिया! गडचिरोलीतील रुग्णांना ‘पाठ’बळ…

गडचिरोलीत कार्यरत असलेल्या ‘सर्च’ संचलित माँ दंत्तेश्वरी हॉस्पिटलमध्ये अलीकडेच ६१ वर्षीय प्रभा भरतकुमार आचाटी यांच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. ...अधिक वाचा
13:18 (IST) 24 Jul 2025

महसूल कर्मचाऱ्याना दांडी मारणे होणार अवघड, फेस ॲप -जिओ‑फेन्सिंगने हजेरी

फेस ॲप -जिओ‑फेन्सिंग सिस्टीम हे महसूल कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे. ...अधिक वाचा
13:18 (IST) 24 Jul 2025

“उद्योगपतीसाठी ८० हजार कोटींचा शक्तिपीठ महामार्ग, शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पैसे नाहीत?”, बच्चू कडू यांचा घणाघात, चक्काजाम सुरू

शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळांच्या प्रश्नांवर बच्चू कडू यांनी आंदोलन पुकारले आहे. संपूर्ण राज्यभरात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केले जात आहे. ...वाचा सविस्तर
12:50 (IST) 24 Jul 2025

प्रियकराने केला पतीचा खून, फोन करून सांगितलं “तुझा नवरा आता घरी येणार नाही”

नवी मुंबईतील वाशी परिसरात एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीच्या पतीचा खून करून त्याचा मृतदेह खाडीत फेकला. ही घटना तीन दिवसांपूर्वी २१ जुलै रोजी दुपारी घडली. ...सविस्तर बातमी
12:48 (IST) 24 Jul 2025

विधवा महिलेला एक लाखांत गुजरातमध्ये विकले, आर्णी येथील संतापजनक प्रकार…

सासरच्या मंडळीनी एका विधवा महिलेस गुजरात येथे विकल्याचा संतापजनक प्रकार आर्णी जवळील देऊरवाडी पुनर्वसन येथे उघडकीस आला आहे. ...सविस्तर बातमी
12:44 (IST) 24 Jul 2025

गोरेगावमधील महानंदा डेअरीच्या शीतगृहात वायुगळती

गोरेगाव येथे पश्चिम द्रुतगती महामार्गानजीकच्या महानंदा डेअरीच्या शीतगृहात बुधवारी रात्री ९ च्या सुमारास वायुगळती सुरू झाली. ...वाचा सविस्तर
12:38 (IST) 24 Jul 2025

पीओपी मूर्तींबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय…सहा फुटांवरील गणेशमूर्तींचे समुद्रातच विसर्जन

सरकारने मोठ्या मूर्तींच्या कृत्रिम तलावातील विसर्जनाबाबत सांगितलेल्या अडचणी विचारात घेऊन न्यायालयाने या मूर्तींचे समुद्रासह अन्य नैसर्गिक जलस्रोतांत विसर्जन करण्यास परवानगी दिली. परंतु, हे आदेश केवळ माघी गणपतीपर्यंतच लागू असतील, असेही बजावले. ...अधिक वाचा
12:32 (IST) 24 Jul 2025

पुण्यातली मेट्रो बिहारपर्यंत… या मार्गावरून माघारी आणण्याची मागणी

महामेट्रोने राखीव संच ठेवले आहेत. त्यातीलच एक संच बिहारला पाठवण्यासाठी केंद्र सरकारने महामेट्रो कंपनीवर दबाव आणला आहेच त्याबरोबर पुण्याचे खासदार, आमदार, पालकमंत्री तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नसल्याचेही आबनावे यांनी नमूद केले. ...वाचा सविस्तर
12:32 (IST) 24 Jul 2025

पिंपरी- चिंचवड: पतीची गळफास घेऊन आत्महत्या; पत्नीचा मृतदेह आढळला

नेमकं पतीने पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या केली का? यासंबंधी पोलीस तपास करत आहेत. ...सविस्तर बातमी
12:32 (IST) 24 Jul 2025

ज्यांच्या विरोधात लढायचे, त्याच भाजप नेत्यांशी युती करणे काँग्रेसला भोवले; चंद्रपूर जिल्हा बँक निवडणुकीत…

चंद्रपूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे राजकारण ३५८ पदांच्या नोकरभरती प्रक्रियेपासून सुरू झाले. या अतिशय वादग्रस्त भरती प्रक्रियेला पहिल्या दिवसापासून माजी मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विरोध केला. ...अधिक वाचा
12:25 (IST) 24 Jul 2025

शेतकऱ्यांनंतर कंत्राटदारही आत्महत्येच्या उंबरठ्यावर - वडेट्टीवार यांची टीका

शेतकरी आत्महत्या करत होते, आता या सरकारने कंत्राटदारांनाही आत्महत्या करण्याची वेळ आणली आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ...सविस्तर वाचा
12:14 (IST) 24 Jul 2025

‘एसटी’ महामंडळाची चिंता वाढली…हा विभागही हतबल...

‘एसटी’च्या वेगवेगळ्या स्थानकांच्या आवारात ‘आरटीओ’ने जप्त केलेली २९३ खासगी वाहने अनेक महिन्यांपासून धूळखात पडून असल्याने महामंडळाच्या बस उभ्या करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. ...वाचा सविस्तर
12:00 (IST) 24 Jul 2025

भरधाव वेगाने हिरवले मातृत्वाचे छत

आई कामावरून परतल्यानंतर तिला दिवसभरातल्या गमती जमती सांगू, तिच्या हातून प्रेमाचे चार घास खाऊ म्हणून दाराकडे एकटक पाहत आस लावून बसलेला तिसरीत शिकरणारा मुलगा आणि आठवीत शिकणाऱ्या मुलीच्या डोक्यावरील मातृत्वाचा पदर वाटेत दबा धरून बसलेल्या काळाने हिरावून घेतला. ...अधिक वाचा
12:00 (IST) 24 Jul 2025

भरधाव वेगाने हिरवले मातृत्वाचे छत

आई कामावरून परतल्यानंतर तिला दिवसभरातल्या गमती जमती सांगू, तिच्या हातून प्रेमाचे चार घास खाऊ म्हणून दाराकडे एकटक पाहत आस लावून बसलेला तिसरीत शिकरणारा मुलगा आणि आठवीत शिकणाऱ्या मुलीच्या डोक्यावरील मातृत्वाचा पदर वाटेत दबा धरून बसलेल्या काळाने हिरावून घेतला. ...अधिक वाचा
11:52 (IST) 24 Jul 2025

संबंध संमतीने… विद्यार्थ्यावर अत्याचाप्रकरणी अटक शिक्षिकेला मिळाला जामीन

शिक्षिकेने मागील १ वर्षापासून मुलाला पंचतारांकीत हॉटेल आणि मोटरगाडीमध्ये मुलासोबत जबरदस्ती केल्याचा आरोप होता. या शिक्षिकेला अटक झाल्यानंतर नुकतीच बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. ...सविस्तर वाचा
11:47 (IST) 24 Jul 2025

Urban Naxalism : “...म्हणून शहरी नक्षलवादाचा ठपका”; आरोग्य सेनेच्या प्रमुखांची सरकारवर जोरदार टीका

आता कोणीही प्रश्नच विचारू नयेत म्हणून शहरी नक्षलवादाचा ठपका मारण्याचे षड्यंत्र आखण्यात आले आहे,’ अशी टीका आरोग्य सेनेचे अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य यांनी बुधवारी केली. ...सविस्तर बातमी
11:44 (IST) 24 Jul 2025

पुणे महापालिकेसाठी 'एवढ्या' मतदारांना मतदानाचा हक्क…

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लांबणीवर पडलेल्या निवडणुका चार महिन्यात घ्याव्या, असे आदेश मे महिन्यात दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगानेही मतदानाची तयारी सुरू केली आहे. ...सविस्तर वाचा
11:36 (IST) 24 Jul 2025

कळंबोली सर्कल विस्तारात ६९२ झाडांचा अडथळा; वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा एमएसआयडीसीचा पालिकेकडे प्रस्ताव

कळंबोली सर्कल येथील वाहतूक सुलभ करण्यासाठी रस्ते आणि उड्डाणपुलांच्या विस्ताराचे जाळे विणले जात आहे. मात्र या उभारणीच्या कामामध्ये ६९२ वृक्ष अडथळा ठरत असल्याने एमएसआयडीसीने पनवेल महापालिकेकडे यातील ६९० वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा आणि दोन वृक्षांची तोड करण्याचा प्रस्ताव मांडला आहे ...अधिक वाचा
11:33 (IST) 24 Jul 2025

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची पुनर्रचना यापूढे पनवेल हे तीसरे तर बेलापूर हे दूसरे परिमंडळ

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या पुनर्रचनेबाबत महत्त्वाचा निर्णय गृह विभागाने बुधवारी शासन निर्णयाव्दारे नवी मुंबई आयुक्तालयात नवीन "परिमंडळ-२, बेलापूर" याची निर्मिती करुन यापूढे पनवेल हे तीसरे परिमंडळ म्हणून कामकाजात ओळखले जाणार आहे. ...सविस्तर बातमी

manikrao kokate

मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह २४ जुलै २०२५