Mumbai News Updates : मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून काही भागात गडगडाटासह पाऊस कोसळत आहे. दरम्यान, पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या कालावधीत मुसळधार पाऊस कोसळून काही भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सकाळी जारी केलेल्या सुधारित अंदाजानुसार मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे कुंडलिका, आंबा नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. रोहा, नागोठणे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाताळगंगा नदी इशारा पातळीवर वाहत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पाच तालुक्यांतील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरांतील, परिसरांतील पावसाच्या तसेच इतर ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.
Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 19 June 2025
मुख्यमंत्री फडणवीस झाले महत्त्वाच्या समितीचे अध्यक्ष, समितीत आणखी कोण, समितीचे काम काय ?
दुष्काळ निवारणासाठी पाच जिल्ह्यांची निवड, जाणून घ्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यांचा समावेश
दिंडोरीत आदिवासी औद्योगिक समूह, ७५ एकर जागेत साकारणार देशातील पहिलाच प्रकल्प
देशभरात खाद्यतेल प्रक्रिया उद्योगांची झाडाझडती
मानसिक-शारीरिक छळाचा आरोप, ६० दिवसांत आईचे परळस्थित घर सोडा न्यायाधिकरणाचे आदेश
साठ्ये महाविद्यालयात विद्यार्थिनीची आत्महत्या, घातपात असल्याचा कुटुंबियांचा आरोप
शिवसेनेच्या वर्धापनदिनी माजी नगरसेवक विजेंद्र शिंदे यांचा ठाकरे यांना जय महाराष्ट्र
Vidio : मुळा मुठा नदीच्या बंधाऱ्यावरील पुलावर दुचाकीस्वार अडकला; पोलिसांनी केली मानवी साखळी
दुबईला जाणाऱ्या प्रवाशाकडून कोट्यावधींचे परदेशी चलन आणि हिरे जप्त
ठाण्यात खापरखवल्या सापाचे दर्शन
मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई; थायलंडमधून आणलेला २५ कोटींचा गांजा जप्त
पानशेतला स्थानिक तरुणाचा पर्यटकांकडून खून, पोलिसांकडून पाच जण जेरबंद
म्हाडा दरडप्रवण क्षेत्रातील संरक्षित जाळ्या बसवणार, ५ कोटी रुपयांची तरतूद…१४ ठिकाणी संरक्षित भिंतींची कामे सुरू…
सुनीतीदेवी सिंघानिया शाळेत विद्यार्थ्यांसह शिक्षकांना डेंग्युची लागण, ठाणे महापालिका शिक्षण विभागाच्या चौकशीत झाले निष्पन्न
लाखोंचा गुटखा पकडला, शिवाजी नगर पोलिसांची कारवाई
पालखी सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस सज्ज; १६२४ पोलीस कर्मचारी, ११८७ होमगार्ड तैनात
संदीप माळवी यांच्याकडे एसआरएचा प्रभारी पदभार; मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्या बदलीमुळे पद होते रिक्त
रेशनचे धान्य विक्री केले… आता पुरवठा विभागाकडून रेशन कार्डच रद्द…
मान्सूनमध्ये बेडूक आणि सरड्याचे विरोधाभासी वर्तन
मुंबईत अतिमुसळधार, तर पालघरमध्ये अतिवृष्टीचा इशारा; सतर्क राहण्याचे हवामान विभागाचे आवाहन
पुणे : पावसामुळे झाड पडून विद्यार्थीनी जखमी
डोंबिवलीत गणेश मंदिर, बाजीप्रभू चौकातील तुंबलेल्या पाण्याचा निचरा
वन अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधील ‘घोडेबाजार’ थांबवा, वन्यजीव प्रेमींचे मुख्यमंत्र्यांना साकडे
जगातील पहिल्या १००० विद्यापीठांत पुण्यातील दोन विद्यापीठांना स्थान
मुक्काम साध्या हॉटेलात, बिले पंचतारांकित हॉटेल्सची; कंपनीच्या व्यवस्थापकाने उकळले लाखो रुपये
वर्धा: निमित्त दुभाजकाचे, इशारा आमदार सुमित वानखेडेंना; आमदार केचेंची आगेकूच…
धक्कादायक! विहिरीला लटकवत ठेवला मृतदेह, हत्या करून आत्महत्येचा बनाव…
Video: हिंजवडी परिसरातील जोरदार पावसामुळे आयटी पार्कमधील रस्ते पुन्हा पाण्यात! वर्क फ्रॉम होमची आयटीयन्सची मागणी
काटई-अंबरनाथ रस्त्यावरील धोकादायक गतिरोधकामुळे वाढते अपघात
रायगड पूर ब्रेकिंग न्यूज टुडे