स्नॅपचॅट या समाज माध्यमावर पाठलाग करून तरूणीचे अश्लील छायाचित्र मिळवून तिला वारंवार धमकावणाऱ्या २३ वर्षीय दोन तरूणांविरोधात मेघवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तरूणी अल्पवयीन असल्यापासून आरोपी तिला त्रास देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा >>> मुंबई : कंपनीच्या खात्यातून ४८ लाख काढल्याप्रकरणी महिला व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल

तक्रारदार तरूणी अंधेरी परिसरातील रहिवासी आहे. नागपाडा येथे बास्केटबॉल कोर्टमध्ये तिची मुख्य आरोपी सोबत ओळख झाली होती. अडीच वर्षांपूर्वी आरोपीने स्नॅपचॅटवर तिला मैत्रीचा प्रस्ताव पाठवला. तो स्वीकारल्यानंतर आरोपी पीडित मुलीचा समाज माध्यमांवर पाठलाग करू लागला. आरोपीने तिच्यासोबत मैत्री केली आणि व्हिडिओ कॉलद्वारे तो तिच्याशी संपर्क साधू लागला. त्यांनतर त्याने मानसिकरित्या तिच्यावर तबाव टाकून तिचे अर्ध नग्न छायाचित्र मिळवले. त्या छायाचित्राद्वारे आरोपीने तिला धमकावण्यास सुरूवात केली. संबंधित छायाचित्र आई-वडिलांना पाठवण्याची धमकी देऊन आरोपीने अनेक वेळा तिची अश्लील छायाचित्रे मिळविली. त्यानंतर आरोपी तिला भेटण्यासाठी बोलावले व छायाचित्राचा धाक दाखवून तिचा विनयभंगही केला. या प्रकारानंतर नुकतीच आरोपीच्या मित्राच्या एका क्रमांकावरून तिला व्हिडिओ कॉल आला. मुलीने तो उचलला असता समोर नग्न अवस्थेत एक तरूण बसला होता. नेहमीच्या त्रासाला कंटाळून अखेर या मुलीने मेघवाडी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>> मुंबईतील दयनीय रस्त्यांचा अहवाल स्वत: महापालिका आयुक्तांनी द्यावा; उच्च न्यायालयाचा आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्य आरोपी व त्याचा मित्र दोघेही २३ वर्षांचे असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीवर मानसिक दबाव टाकून तिच्याकडून अश्लील छायाचित्र मिळवल्यानंतर आरोपीने तिला धमकावण्यास सुरूवात केली. फेब्रुवारी २०२० ते १६ सप्टेंबर २०२२ या काळात तरूणीला आरोपींनी त्रास दिला. अखेर याप्रकरणी एकाला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मेघवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.