लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : कडक उन्हामुळे होणारी काहिली शमविण्यासाठी थंड पेय प्यायल्याने मुंबईकरांच्या घशास संसर्ग होत आहे. घशास खवखवीमुळे त्रासात भर पडली आहे. मागील काही दिवस अशा रुग्णांच्या संख्येत ५० ते ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांचा कल थंडगार पदार्थ खाण्याकडे व शीतपेय, ताक, लस्सी आदी पिण्याकडे वाढला आहे. भर उन्हात दुपारी कामानिमित्त बाहेर पडल्याने अनेकजण लस्सी, ताक आणि इतर शीतपेये पिण्याला प्राधान्य देत आहेत. मात्र यामुळे त्यांच्या घशाला संसर्ग होत आहे. काही जणांना घशाला सूजही येत असल्याचे निदानात स्पष्ट झाले आहे.

आणखी वाचा-म्हाडातील फंजीबल चटईक्षेत्रफळ घोटाळा; आतापर्यंत मंजूर प्रस्तावांची छाननी होणार

उन्हामुळे अनेकांमध्ये पित्तप्रकोप वाढला आहे. अनेकदा पित्ताच्या वाढीमुळे घशातील खवखव वाढते. पित्त आणि थंडपेयांच्या सेवनामुळे घशाला सूज येण्याचे प्रकार वाढले आहेत. घशातील संसर्गामुळे खाताना त्रास होणे, तापाची लक्षणांना सामोरे जावे लागत असल्याचे डॉ. धीरजकुमार नेमाडे म्हणाले. असे रुग्ण दिवसाला १० ते १५ रुग्ण रुग्णालयात येत आहेत. यात लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती बॉम्बे रुग्णालयातील ‘कान-नाक-घसा’ विभागाचे सल्लागार डॉ. मिनेश जुवेकर यांनी दिली.

निर्माणाधीन इमारतींची संख्या अधिक असल्याने वातावरणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. याशिवाय वाहनांची वर्दळीमुळे वायूप्रदूषणात भर पडली आहे. धुळीमुळे नागरिकांच्या घशाला संसर्ग होण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा-रेल्वेच्या वक्तशीरपणात ‘एसी’चा खोडा; गोरेगाव-चर्चगेट जलद लोकल रद्द करण्याचा घाट

काळजी घ्या

  • थंडपेये पिणे टाळा
  • दुपारचे उन्हात फिरणे टाळा
  • साधे पाणी प्या
  • घरातून पाणी घेऊन बाहेर पडा
  • मुखपट्टीचा वापर करा