राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. पहाटे पाच वाजताच ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घऱी पोहोचले होते. यानंतर त्यांनी ईडी कार्यालयात नेण्यात आलं असून चौकशी सुरु आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँण्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांची चौकशी केली जात असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून टीका केली आहे.

”यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याचं हे उदाहरण आहे. आम्हाला खात्री होती की आज ना उद्या हे घडेल. कारण, नवाब मलिक हे जाहीरपणे बोलतात, त्यामुळे काहीतरी प्रकरण काढून त्यांना असा त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे त्याबद्दल अधिक भाष्य करण्याची गरज नाही,” असं शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

Nawab Malik ED Inquiry live : दाउद इब्राहिम कनेक्शन; नवाब मलिकांची ईडीकडून चौकशी सुरू

“काही झालं तर आणि विशेषकरुन मुस्लीम कार्यकर्ता असला तर दाऊदचं नाव घेतलं जातं. मी राज्याचा मुख्यमंत्री असतानाही असा आरोप झाला होता. त्यावेळीही असंच वातावरण निर्माण करण्यात आलं होतं. त्याला आता २५ वर्ष झाली. पुन्हा तशीच नावं घेऊन लोकांना बदनाम करणं, लोकांना त्रास देणं, सत्तेचा गैरवापर करण्याचं काम सुरु आहे. जे लोक केंद्र सरकारविरोधात तसंच विरोधात वापरल्या जाणाऱ्या तपास यंत्रणांविरोधात जे भूमिका मांडतात त्यांना हा त्रास देण्याचा प्रयत्न असून तेच घडलं आहे,” असंही शरद पवार म्हणाले.

नवाब मलिकांची ईडीकडून चौकशी सुरु असतानाच राष्ट्रवादीकडून आली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “राग काढण्याचे…”

“नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचे काम”

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली असून नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचे काम कदाचित चालू झालेलं दिसत आहे अशी टीका केली आहे. ते म्हणाले की, “हा सत्तेचा दुरुपयोग करण्याचा आणखी प्रकार आहे, कोणतीही, सूचना ने देता पहाटे सहा वाजता येऊन ईडी स्वतःच पोलीस आणत राज्यातील मंत्र्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता घेऊन जाणं ही नियमांची पायमल्ली आहे”.

“अलीकडे नवाब मलिक यांनी काही प्रकरणं बाहेर काढली होती, त्याची प्रतिक्रिया म्हणून त्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचं काम करण्याचा प्रयत्न काही लोकं करत आहे. नेमकं कोणते प्रकरण आहे याबद्दल माहिती नाही, गेल्या काही वर्षात असं प्रकरणही दिसत नाही. नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचे काम कदाचित चालू झालेलं दिसत आहे,” अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊतांची प्रतिक्रिया –

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “ नवाब मलिक असतील किंवा आमच्यासारखे खूप लोक आहेत, जे सातत्याने बोलत आहेत. असत्य उघड करत आहे, मुखवटे उलगडून काढत आहेत. त्यांच्यामागे आता देशभरात ईडी,सीबीआय वैगरे लावलं जात आहे. नवाब मलिक यांना आज सकाळी ईडीची लोक घरी आले आणि घेऊन गेले. ठीक आहे, चौकशी होईल आम्ही वाट बघतोय. नक्कीच ते संध्याकाळी घरी येतील. आताच माझं सगळ्यांची वरिष्ठ स्तरावर बोलणं झालं आहे.”