मुंबई : पावसाळ्यात मध्य रेल्वेने नेरळ-माथेरान नॅरोगेज मार्गावरील रेल्वे सेवेत बदल केला आहे. नेरळ-अमन लाॅज विभागादरम्यानची नियमित प्रवासी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत ही सेवा बंद राहील. माथेरान ते अमन लॉज दरम्यानच्या शटल सेवा सुरू राहील.
नेरळ-माथेरान दरम्यान धावणारी मिनी ट्रेन माथेरानची राणी म्हणून प्रसिद्ध असून पर्यटकांसाठी खास आकर्षण केंद्र आहे. पावसाळ्यात येथील निसर्गदृश्य पाहण्यास पर्यटकांची मोठया संख्येने गर्दी जमते. मात्र, पावसाळ्यात नेरळ-माथेरान नॅरो गेज मार्गावरील माथेरान-अमन लॉज शटल सेवा धावणार आहे. याकाळात प्रवाशांना नेरळ ते अमन लॉज पर्यंत जाण्यासाठी पर्यायी वाहतुकीचा अवलंब करावा लागेल.
माथेरान-अमन लॉज शटल सेवा (दैनंदिन)
* माथेरान येथून रोज सकाळी ८.२०, सकाळी ९.१०, सकाळी ११.३५, दुपारी २, दुपारी ३.१५, सायंकाळी ५.२० वाजता सुटेल. ही गाडी अमन लॉज अनुक्रमे सकाळी ८.३८, सकाळी ९.२८, सकाळी ११.५३, दुपारी २.१८, दुपारी ३.३३, सायंकाळी ५.३८ वाजता पोहचेल.
अमन लॉज-माथेरान शटल सेवा (दैनंदिन)
* अमन लॉज येथून रोज सकाळी ८.४५, सकाळी ९.४५, दुपारी १२, दुपारी २.२५, दुपारी ३.४०, सायंकाळी ५.४५ वाजता सुटेल आणि माथेरान येथे अनुक्रमे सकाळी ९.०३, सकाळी ९.५३, दुपारी १२.१८, दुपारी २.४३, दुपारी ३.५८, सायंकाळी ६.०३ वाजता पोहचेल.
* शनिवारी-रविवारी विशेष गाडी माथेरान सकाळी १०.०५, दुपारी १.१० वाजता अमन लॉजसाठी सुटेल. तसेच अमन लॉज येथून विशेष गाडी सकाळी १०.३०, दुपारी १.३५ वाजता सुटेल.
* सोमवारी ते शुक्रवारपर्यंत विशेष गाडी अमन लॉज येथून सकाळी १०.२२ वाजता सुटेल आणि माथेरान येथे सकाळी १०.४४ वाजता पोहचेल. तसेच माथेरान येथून दुपारी १२.२५ वाजता सुटेल आणि अमन लॉज येथे दुपारी १२.४३ वाजता पोहचेल.
* सर्व शटल सेवा तीन द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी डब्बा आणि २ द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅनसह चालतील.