लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणी आणखी एका आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अटक आरोपींची संख्या चारवर पोहोचली आहे. दरम्यान, यापूर्वी याप्रकरणी फेसबुक पोस्ट करणारा संशयीत आरोपी शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकरला (२८) अटक करण्यात आली आहे.

हरिकुमार बलराम (२३) असे अटक आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील बहराईच येथील रहिवासी आहे. तो पुण्यातील भंगारच्या दुकानात काम करीत होता. या कटात त्याचा सहभाग असून त्याने पैसे व इतर मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे येथील कार्यालयाबाहेर निर्मल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भररस्त्यात बाबा सिद्दीकी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबार करणाऱ्यांपैकी दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून तिसऱ्या आरोपीच्या शोधासाठी मुंबई पोलिसांचे १५ पथके तैनात केली आहेत.

आणखी वाचा- Ratan Tata : “मग कुत्रे कुठे जातील?”, बॉम्बे हाऊसच्या नुतनीकरणावेळी रतन टाटांना चिंता; एन. चंद्रशेखर यांनी शेअर केली जिव्हाळ्याची आठवण!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या संशयित आरोपींच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या संशयित आरोपींकडून दोन पिस्तुल आणि २८ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.