लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: लोकलमधील गर्दीचा फायदा घेऊन मोबाइल चोरणाऱ्या आरोपीला कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

कुर्ला रेल्वे स्थानकात लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची नेहमीच मोठी गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडत असतात. त्यामुळे या स्थानकांत साध्या वेशातील पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. फलाट क्रमांक ६ वर बुधवारी एका प्रवाशाच्या खिशात हात घालून मोबाइल चोरणाऱ्या चोराला गस्तीवर असलेल्या पोलीस महिला शिपायाने ताब्यात घेतले. त्याला कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

हेहा वाचा… मुंबई: दादर-पुणे मार्गावर ई-शिवनेरीच्या ६० फेऱ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

झडती घेतल्यानंतर त्याच्याजवळ चोरलेला मोबाइल सापडला. पोलिसांनी त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. अटक आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध रेल्वे पोलीस ठाण्यात दहा ते बारा गुन्हे दाखल असल्याची माहिती कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी दिली.