मुंबई : मुंबईत मंगळवारी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. रात्री ८.३० वाजेपर्यंत राम मंदिर येथे ७८ मिमी असा २४ तासांचा सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला. कु लाबा येथे कमाल तापमान ३१ अंश तर किमान तापमान २५.५ मिमी नोंदवले गेले. तसेच सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३१.१ आणि कि मान तापमान २५.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुढील ३ दिवस मुंबई, ठाणे, पालघर येथे मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रायगड, रत्नागिरी येथे पुढील २ दिवस तीव्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोकण, घाटमाध्यावर पुढील तीन दिवस पावसाचे

पुणे : महाराष्ट्र आणि कर्नाटक किनापट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून तो पुढील तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. गेल्या २४ तासात कोकणात मुसळधार, मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मुंबई आणि ठाणे परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद करण्यात आली. रत्नागिरी जिल्हा, नाशिक जिल्ह्याचा पश्चिम पट्टा, तर पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain fall in mumbai akp
First published on: 21-07-2021 at 01:34 IST