scorecardresearch

“काकूचे मंगळसूत्र काढायचं नाही”; काकांच्या अंत्यविधीला रुपाली चाकणकरांनी मोडली प्रथा

रुपाली चाकणकर यांचे काका सैन्य दलात कार्यरत होते. त्यांच्या कुटुंबाला या गोष्टीचा खूप अभिमान होता.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या काकांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना घडली आहे. चाकणकर यांनी फेसबुकवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी आपल्या काकांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

चाकणकरांची फेसबुक पोस्ट
पोस्टमध्ये रुपाली चाकणकर म्हणतात “काल पंढरपुर दौरा करुन पुण्याकडे निघताना बंधुचा फोन आला, रात्रीचे ११.३० वाजले असतील, अस्वस्थ होत मला निरोप दिला, काका अचानक हृदयविकाराच्या झटक्याने गेले आहेत, आता हॉस्पिटलला आम्ही सगळे आलो आहोत, तु पोहचण्याचा प्रयत्न कर. हि दुःखद बातमी ऐकुन मला धक्काच बसला. लहानपणापासुनचा एकत्र कुटुंबातील जीवनप्रवास डोळ्यासमोरुन सरकु लागला, फार मोठ्या एकत्र कुटुंबात वाढले,एकुण सात काका,एक आत्या,सात भाऊ,बारा बहिणी या सर्वांचे एकत्र कुटुंब,हे माझे काका सहा नंबरचे. जेव्हापासून हे जग समजतं तेव्हापासुन त्यांना सैनिकी वेषात पाहिलेले, सैनिक म्हणुन देशसेवा करीत असताना ,गावाला ,कुटुंबाला फार मोठा अभिमान”च


काकांच्या मृत्यूनंतर जेव्हा नातेवाईक काकीचे मंगळसुत्र काढण्यासाठी पुढे गेले, तेव्हा काकीच मंगळसुत्र कोणी काढायचं नाही, असा पवित्रा रुपाली चाकणकर यांनी घेतला. कुंकु न पुसतां.जोडवी न काढतां ,बांगड्या न काढता काकांचा अंत्यविधी झाला. पतीच्या अंत्यविधीत पत्नीला मिळणारी वागणुक जास्त वेदनादायक असते, विधवा महिलांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहोत. या सामाजिक क्रांतीच्या विचारात एक पाऊल पुढे टाकताना आपणही सर्वजण सहभागी होऊ या, असे आवाहन रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rupali chakankars uncle dies of heart attack dpj

ताज्या बातम्या