मुंबई : नागपूर – मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्पातील शिर्डी – भरवीरदरम्यानचा ८० किमीचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास, आज शनिवारी वर्ष पूर्ण झाले आहे. या एका वर्षात या महामार्गावरून एक कोटी वाहने धावली, तर पथकरापोटी ७२५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.

राज्याची राजधानी आणि उपराजधानीमधील अंतर कमी करण्यासाठी ‘एमएसआरडीसी’ने ७०१ किमीच्या समृद्धी महामार्गाचे बांधकाम हाती घेतले आहे. त्यातील ६२५ किमीचा मार्ग सेवेत दाखल झाला आहे. नागपूर – शिर्डी टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये तर शिर्डी – भरवीर टप्पा २५ मे २०२३ रोजी वाहतूक सेवेत दाखल झाला. तसेच भरवीर – इगतपूरीदरम्यानचा २५ किमीचा टप्पा मार्च २०२४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्यात आला आहे. अतिवेगवान प्रवासामुळे या महामार्गाला चांगला प्रतिसाद मिळाला. डिसेंबर २०२२ पासून २३ मे २०२४ पर्यंत या महामार्गावरून ९९ लाख ८० हजार वाहनांनी प्रवास केल्याची माहिती ‘एमएसआरडीसी’तील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा…मुंबई पदवीधरवरून भाजप, शिंदे गटात चढाओढ; ठाकरे गटाकडून अनिल परब उमेदवार

संपूर्ण महामार्ग ऑगस्टमध्ये सेवेत

●शिर्डी – भरवीर टप्प्याला आज, शनिवारी एक वर्ष पूर्ण

●आतापर्यंत समृद्धीवरून एक कोटी वाहनांचा प्रवास

●इगतपुरी – आमणे शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये सेवेत

●मुंबई – नागपूर प्रवास केवळ आठ तासांत शक्य