जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती तसंच चलनवाढीची चिंता याचे परिमाम शेअर बाजारात दिसत आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारात तेजी होती. मात्र बुधवारी सेन्सेक्स ५०० अंकांनी कोसळला आहे. मंगळवारी दिवस संपताना सेन्सेक्स आणि निफ्टी दिवसभरातील निचांकी पातळीपासून सावरत सकारात्मक पातळीवर स्थिरावले होते. पण बुधवारी बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये घसरण झाल्याचं पहायला मिळालं आहे.सेन्सेक्स ५०० अंकानी घसरुन ५२.६७५ वर उघडला तर निफ्टी १५४ अंकानी घसरुन १५,६९५ वर उघडला.

मंगळवारी दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १६.१७ अंशांच्या वाढीसह ५३,१७७.४५ पातळीवर विसावला. जागतिक बाजारातील कमकुवत आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून शेअर्स विक्रीच्या माऱ्यामुळे सेन्सेक्सने दिवसभरातील सत्रात सोमवारच्या बंद पातळीच्या तुलनेत ३९० अंश गमावत ५२,७७१ अंशांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १८.१५ अंशांची घसरण झाली आणि तो १५,८५०.२० पातळीवर बंद झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे रुपयानेदेखील नवा नीचांक गाठला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरु असून मंगळवारच्या सत्रात रुपयाने ४६ पैसे मूल्य गमावून ७८.८३ वर पोहोचला आहे.