मुंबई: मुंबईत आता पुन्हा मागील दोन दिवसांपासून धुरके पसरले आहे. मुंबईत अजूनही हवी तशी थंडी पडलेली नाही. तरीदेखील धुके आणि प्रदूषकांमुळे वातावरणात दुपारनंतरही धुरके जाणवून येत आहे.

समीर ॲपनुसार शनिवारी सकाळी मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक १५६ इतका होता. गेले काही दिवस मुंबईच्या हवेचा दर्जा खालावला आहे. अनेक भागात ‘वाईट’ हवेची नोंद झाली आहे. त्यात वांद्रे कुर्ला संकुल येथे शुक्रवारी सर्वात वाईट हवेची नोंद झाली. तेथे हवा गुणवत्ता निर्देशांक २९७ होता. तेथे पीएम २.५ ची मात्रा अधिक असल्याचे दिसून आले. याबरोबरच चेंबूर, मालाड, शिवाजी नगर आणि शिवडी येथेही हवेचा दर्जा वाईट असल्याची नोंद झाली.

हेही वाचा… नववर्ष स्वागत समारंभांना करोनाची धास्ती; वाढत्या रुग्णसंख्येमुळे गर्दी टाळण्याचा डॉक्टरांचा सल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात आणि मुंबईदरम्यान प्रतिचक्रवात स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे वाऱ्यांची स्थिती बदलली. अशावेळी प्रदूषके जमिनीलगत अनेकवेळा साचून राहतात. तसेच ती दूर वाहून नेली जाऊ शकत नाहीत, अशी माहिती हवामान विभागाने दिली. गुरुवार आणि शुक्रवारी हलके धुरके जाणवले. तसेच ३० डिसेंबर रोजी पश्चिमी प्रकोपाची निर्मिती होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या हवेमध्ये आर्द्रताही सरासरीपेक्षा अधिक असेल. दरम्यान, आर्द्रतायुक्त हवेमध्ये प्रदूषके साचून राहत असल्याने मुंबईत धुरके पसरले आहे.