मुंबई : राज्य सरकारने १२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, उद्योग विभागाच्या सचिवपदी डॉ. पी. अनबलगन तर ‘बेस्ट’च्या महाव्यवस्थापकपदी डॉ. हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा – सलग दुसऱ्या दिवशी हवेची स्थिती खालावलेली; माझगाव, नेव्ही नगर कुलाबा, मालाड येथील हवा ‘वाईट’

हेही वाचा – मुलुंड न्यायालयात साप आढळल्याने घबराट, तासाभराच्या गोंधळानंतर कामकाज सुरळीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे. डॉ. बी. राधाकृष्णन यांची ‘महाजेनको’ या वीज कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर संजय दैने (वस्त्रोद्योग आयुक्त, नागपूर), राहुल कर्डिले (नाशिक महानगरपालिका आयुक्त), सी. वनमती (जिल्हाधिकारी वर्धा), संजय पवार (सहआयुक्त विक्रीकर विभाग), अविशंत पंडा (गडचिरोली जिल्हाधिकारी), विवेक जॉनसन (मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर जिल्हा परिषद), अण्णासाहेब चव्हाण (मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना, मुंबई), गोपीचंद कदम (मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर स्मार्ट सिटी) आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.