मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युशी संबंधित अमलीपदार्थप्रकरणी त्याचा मित्र सिद्धार्थ पिठानीला उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकलपीठाने पिठानीला ५० हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. जमिनीचा तपशीलवार आदेश नंतर देण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिठानीला मे २०२१ मध्ये केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) अटक केली होती. त्याला अमलीपदार्थांची तस्करी आणि आरोपींना आश्रय दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आपल्याला याप्रकरणी गोवण्यात आले आहे. शिवाय आपल्याकडे कोणतेही अमलीपदार्थ सापडले नव्हते किंवा आपण अमलीपदार्थ तस्करीच्या टोळीचा भाग नाही, असा दावा करून पिठानीने जामिनाची मागणी केली होती. याप्रकरणी अभिनेत्री आणि सुशांतची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविकलाही अटक करण्यात आली होती. दोघेही जामिनावर बाहेर आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushant singh rajput friend siddharth pithani bail granted by high court ysh
First published on: 04-07-2022 at 13:57 IST