शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यातील एक फोटो शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. “वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा…”, असं म्हणत सुषमा अंधारेंनी दोन फोटो शेअर केले. तसेच यातून एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं.

सुषमा अंधारेंनी ट्वीट केलेला पहिला फोटो जुना आहे. यात नरेंद्र मोदी मुंबईत आले तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वाकून नमस्कार करताना दिसत आहेत. तसेच दुसरा फोटो नरेंद्र मोदींच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यातील आहे. या फोटोत एकनाथ शिंदे मोदींना वाकून नमस्कार करताना दिसत आहेत.

हेही वाचा : “खान, शेख नाव नसल्यामुळं आमच्या नवनीत अक्काचं भगव्या कपड्यातील ते गाणं..”, सुषमा अंधारेंची खोचक टीका

सुषमा अंधारे यांनी हे दोन्ही फोटो ट्वीट करताना ‘हाच तो फरक’ म्हणत बाळासाहेब ठाकरे असताना त्याचं राजकीय स्थान आणि एकनाथ शिंदे यांचं राजकीय स्थान यावरून खोचक टोला लगावला आहे.

महाप्रबोधन यात्रेचा समारोप मुंबईत!

दरम्यान, सुषमा अंधारे सध्या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या विविध भागात सभा घेत आहेत. या यात्रेचा समारोप मुंबईत होईल, असं त्यांनी सांगितलंय. बीडमध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना त्या म्हणाल्या होत्या, “समारोपाची मोठी सभा मुंबईला होईल. त्यासाठी उद्धव ठाकरे, राज्यातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, मविआतील सगळे नेते उपस्थित असतील. ठाकरे गटाच्या मोठ्या ८ सभा होतील.”

संजय शिरसाटांना टोला!

यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गटावर तोंडसुख घेतलं होतं. उद्धव ठाकरेंचं पक्षाध्यक्षपदच बेकायदेशीर असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. त्याचा समाचार घेताना अंधारेंनी आगपाखड केली होती. “काही पेड ट्रोलर्स चुकीची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीजण सांगतात की ‘शिवसेनेचे पक्षप्रमुख, पक्ष बेकायदेशीर आहेत, मान्यता आम्हालाच मिळणार आहे’. संजय शिरसाटसारखा माणूस असं सांगत असेल तर मग निवडणूक आयोगाने तुमच्या कानात येऊन हे सांगितलंय का? निवडणूक आयोग तुमच्या घरचं आहे का? तुम्ही इतक्या ठामपणे सांगताय, तर मग तुमची आणि आयोगाची साठगाठ झाली आहे का? नसेल झाली, तर तुमच्यावर खटला दाखल करावा का?” असे सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केले होते.

हेही वाचा : “‘चिल्लर सेने’बाबत मला काहीही बोलायचं नाही, कारण…”, सुषमा अंधारे यांचं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“शिंदे गटाकडे मतांची टक्केवारी आहे कुठे?”

“वस्तुस्थिती ही आहे की कुठल्याही राजकीय पक्षाचे आमदार किंवा खासदार किती आहेत, यावर पक्षाची मान्यता ठरत नसते. जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे, त्यानुसार हे मी सांगते. एखादा पक्ष प्रादेशिक आहे की राष्ट्रीय किंवा त्या पक्षाला निवडणूक चिन्ह काय द्यायचं हे त्या पक्षाला मिळालेली मतांची टक्केवारी किती आहे, यावर ठरतं. ही मतांची टक्केवारी शिवसेनेने सिद्ध केलेली आहे. अंधेरी पूर्वच्याही निवडणुकीला आपण सामोरे गेलो आहोत. शिंदे गटात गेलेल्या आमदारांचीही मतांची टक्केवारी आपलीच आहे. ते निवडणुकीलाच कधी सामोरे गेलेले नाहीत, तर मतांची टक्केवारी कुठे आहे त्यांच्याकडे? हा कायद्याचा पेच आहे”, असं सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या होत्या.